शिवसेना खासदार भावना गवळी यांना ईडीने पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहा म्हणून समन्स बजावलं आहे. 20 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भातलं हे समन्स आहे. याआधी 29 सप्टेंबरला त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं. त्यामध्ये त्यांना 4 ऑक्टोबरला त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र त्या चौकशीसाठी हजर राहिल्या नाहीत. आता पंधरा दिवसांनी त्यांना दुसरं समन्स बजावण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT
ईडीने गेल्या महिन्यात खासदार भावना गवळी यांचे निकटवर्तीय सईद खान यांना अटक केली. भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाले आहेत.
भावना गवळी ED case: ED च्या अटकेत असलेला सईद खान कोण आहे?
भावना गवळी यांना का बजावण्यात आलं समन्स?
भावना गवळी यांच्या आईसह सईद खान हे महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेचे संचालक होते. 2019 मध्ये या संस्थेला फर्ममध्ये सामील करून घेण्यात आलं. त्यापूर्वी ट्रस्ट होती. या ट्रस्टमध्ये स्वतः भावना गवळी आणि त्यांची आई शालिनीताई या सदस्य होत्या. ट्रस्टचे रुपांतर फर्ममध्ये करत असताना धर्मादाय आयुक्तालयात फसवणूक केली गेली असल्याचा ईडीला संशय आहे. त्याचबरोबर फर्मचा वापर फसवणूक आणि मनी लाँड्रिंगसाठी केल्याचाही संशय आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे भावना गवळी यांच्याशी संबंधित या ट्रस्टच्या व्यवहारात 17 कोटींची अनियमितता आढळून आली आहे. सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा यांचा आरोप आहे की, भावना गवळी यांनी बालाजी सहकारी पार्टिकल मंडळाच्या माध्यमातून 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेऊन राष्ट्रीय सहकारी विकास परिषदेची फसवणूक केली आहे. भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून दहा वर्षांसाठी पैसे घेतले होते. पण प्रत्यक्षात कंपनी सुरूच केली गेली नाही,’ असा सारडा यांनी केलेला आहे. याच प्रकरणी आता ईडीने भावना गवळी यांना समन्स बजावलं आहे.
Exclusive : ED च्या रडारवर भावना गवळी, Bhavna Agro कंपनीचं गौडबंगाल काय?
नेमकं प्रकरण काय आहे?
बालाजी सहकारी पार्टिकल बोर्ड कारखाना हा पार्टिकल बोर्ड चे पार्ट तयार करण्यासाठी निर्मिण्यात आला. हा कारखाना वाशिमच्या शिरोडमध्ये आहे.
हा कारखाना 1992 मध्ये पुंडलिक रामजी गवळी यांनी सुरू केला. पुंडलिक गवळी हे भावना गवळी यांचे वडील आहेत. भावना गवळी या वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. या फॅक्टरीला नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थातत NCDC ने भांडवल दिलं. तसंच राज्य सरकारनेही मिळून यामध्ये 55 कोटींची गुंतवणूक आहे.
इतकं सगळं होऊनही आश्चर्याची बाब ही आहे की हा कारखाना कधी सुरूच झालाच नाही. या कारखान्यात कुठलंही उत्पादन न होता हा कारखाना तोट्यात गेला असं दाखवण्यात आलं आहे.
या कारखान्यासाठी जे साहित्य मागवण्यात आलं त्याचे दर डोळे विस्फारणारे आहेत. खासरून बाहेरून आयात करण्यात आलेल्या मशीनच्या किंमती या कोड्यात टाकणाऱ्या आहेत.
या कारखान्यावर झालेला सगळ्यात आलेला आरोप हा आहे की या कंपनीचं बाजारमूल्य हे 55 कोटी असताना या कारखान्याचं अवमूल्यांकन करण्यात आलं आहे. 7 कोटी 9 लाख 90 हजार इतकं कमी मूल्य या कारखान्याचं दाखवण्यात आलं. हे अवमूल्यांकन पुण्यातील MITCON कंपनीने केलं आहे.
भावना अॅग्रो या कंपनीने बालाजी कारखाना लिक्विडेटर बोर्डाला फक्त 25 लाख रूपये दिले होते. 2010 मध्ये झालेल्या व्यवहारानंतर आज पर्यंत बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाकडे आजपर्यंत 6.9 कोटी रूपये येणं आहे. बालाजी कारखान्याच्या लिक्विडेटर बोर्डाने रिसोड क्रेडिट सोसायटीने मंजूर केलेल्या गॅरंटीची मागणी केली नाही. भावना अॅग्रोकडून ही रक्कम वसूल करण्यासाठी कोणतं पाऊलही उचललेलं नाही. गैरव्यवहाराचा दुसरा भाग असा की की क्रेडिट सोसायटीने या व्यवहारासाठी मंजूर केलेली बँक गॅरंटी वसू केली नाही.. किंवा रद्दही केली नाही.
किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले आहेत?
भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून 18 कोटी रुपये काढलेले आहेत. त्यात सात कोटीं चोरीला गेल्याची तक्रार दिलीये. केंद्र सरकारचे 44 कोटी 11 कोटी रुपये स्टेट बँकेचे आहेत. बालाजी पार्टिकल बोर्ड कारखाना 55 कोटींत उभारण्यात आला आणि भावना अॅग्रो लिमिटेडने फक्त 25 लाखांत तो खरेदी केला.
ADVERTISEMENT