मुंबई : बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यामध्ये आज वादाची ठिणगी पडली आहे. राहुल शेवाळी यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात लोकसभेत बोलताना आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला त्यामुळे वातावरण तापलं होतं. अशातच याला प्रत्युत्त म्हणून आदित्य ठाकरे यांनी राहुल शेवाळे यांच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलत त्यांच्यावर टीका केली.
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे यांच्या या टिकेला उत्तर देताना माझ्या बदनामीमागे आदित्य ठाकरे असून त्यांनी संस्कृती शिकवू नये असा आरोप शेवाळे यांनी केला. ते मुंबई तकला दिलेल्या विषेश मुलाखतीमध्ये बोलतं होते.
राहुल शेवाळे काय म्हणाले?
आदित्य ठाकरेंना सांगू इच्छितो की ते ज्या गोष्टीचा उल्लेख करतात त्याबद्दल माझ्या पत्नीने स्वतः पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे की या सगळ्या खोट्या केसेस आहेत. माझ्या पत्नीच्या तक्रारीनुसार गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. साकीनाका पोलीस स्टेशनला त्या महिलेच्या विरुद्ध गुन्हा दाखल आहे. अंधेरी कोर्टाने त्या महिलेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या महिलेला अटक करण्याकरिता अटक वॉरंट पण काढलेलं आहे.
मी आता किती दिवस या गोष्टीचा उल्लेख करत नव्हतो, परंतु आज मी सांगू इच्छितो या गोष्टीच्या मागे आदित्य ठाकरेंही हात आहे. पोलीस तपासात पण हे दिसून येत आहे. कारण ट्विटरवर जी काही माझी बदनामी केली जाते त्या बदनामीला आदित्य ठाकरेंकडून पाठिंबा दिला जातो. हे ट्विटरच्या आणि पोलिसांच्या तपासामधून हे दिसून आलेलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्यामुळे आदित्य ठाकरेंनी मला संस्कृती शिकवू नये आणि अशा गोष्टींचा उल्लेख करू नये.
माझं घर चांगलं आहे. आम्ही आम्ही घरात सर्वजण सुखी आहेत. माझ्या पत्नी आणि मुले आम्ही सुखी आहोत. त्यामुळे मला संस्कृतीबाबत त्यांनी शिकवू नये आणि घराच्या बाबतीत उल्लेख करू नये. दुर्दैवाने अशा या गोष्टीच्या वेळी घरात कलह निर्माण होईल अशा गोष्टी त्यांनी करून आणि त्यांनी या गेल्या दोन महिन्यापासून ज्यावेळी मी शिवसेना सोडली तेव्हापासून माझ्या घरात कलह निर्माण व्हावं याकरता त्यांनी या सर्व गोष्टी केलेले आहेत.
आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?
नागपूरमध्ये बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते, मी एवढचं सांगेन की, Love You More. मुख्यमंत्र्यांवरुन वाचविण्याचा, राज्यपालांना वाचविण्याचा हा प्रयत्न असावा. ज्यांची निष्ठा घरात नसते, त्यांच्याकडून चांगलं अपेक्षित नाही. मला त्या घाणीत जायचं नाही. मी या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही.
आता त्यांचं लग्न आमच्या घराण्याने कसं वाचवलं हे मला माहित आहे. पण मला यात जायचं नाही. काय काय लोकांच्या खाजगी आयुष्यात मला डोकावायचं नाही. ते माझ्यावर संस्कार नाहीत, मला या घाणीत जायचं नाही. आता वर्ल्डकप बघितला असेल. आपण गोल मारतं राहू. ते सेल्फ गोल मारतायतं. त्यांचे अनेक व्हिडीओज आहेत. पण मी कुठेही यांच्यावर घाणेरेडं बोलणार नाही, असं ते म्हणाले.
ADVERTISEMENT