प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला पहाटेचा शपथविधी महाराष्ट्र अद्यापही विसरलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच अजित पवारांना शरद पवारांकडे पाठवलं होतं अशी चर्चा तेव्हापासून होते आहेत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी शरद पवारांना मुलाखतीत नेमका हाच प्रश्न विचारला तेव्हा शरद पवार म्हणाले की मी त्यांना पाठवलं असतं तर अजित पवारांनी अर्धवट काम नसतं केलं. आता अजित पवार परत का आले? त्यांच्यासोबत गेलेले आमदार परत का आले याचं उत्तर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी पाहून मला धक्काच बसला होता-शरद पवार
काय म्हणाले संजय राऊत?
शरद पवार जे सांगत आहेत त्या अर्थी त्यांना मोदींनी एकत्र येण्याची ऑफर दिली असणार यात काही शंकाच नाही. कारण त्यावेळी भाजप महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी इतका उत्तेजित झाला होता की काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता.
शरद पवार Vs बाळासाहेब विखे पाटील घराण्याच्या संघर्षाचा इतिहास
शरद पवारांना आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती आणि कुठून काय बोलणी सुरु होती याविषयी आम्हाला माहिती आहे. तेदेखील आमच्यासोबत यासंदर्भात बोलले होते. त्या काळात आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हतं. कोण काय बोलतंय, कुणाला भेटतंय याबाबत पारदर्शकता होती याबाबत भाजपाला माहिती नव्हतं. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचं सरकार येऊ शकलं नाही.’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे सरकार आणि भगतसिंह कोश्यारी यांच्यात विस्तव का जात नाही?
अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती. असंही यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. याबाबत थोडं विस्ताराने सांगा असं सांगितल्यावर संजय राऊत म्हणाले, ‘मी असं म्हणतोय की पारदर्शकता होती. राजकारणात पारदर्शकता असायला हवी. इतकी मोठी घडामोडी घडत असताना कोण काय करत आहे? उद्या काय होणार? संध्याकाळी काय होणार?…आपण महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन घडवण्यासाठी चाललो होतो. कुठेही कोणता दगड आडवा येईल तो काढत राहिलो. आमच्याकडे तेव्हाही जेसीबीच होता’ असा टोला संजय राऊत यांनी लगावला. पारदर्शकता असल्याने सगळे आमदार आणि अजित पवार परत आले असंही शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT