Shiv Sena : ७ जिल्हाप्रमुख शिंदेंना अडचणीत आणणार? आयोगात दोन्ही गट भिडले!

मुंबई तक

17 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:15 AM)

shivsena symbol thackeray group objects to shinde group 7 district chief अकोला : शिवसेना कोणाची? या प्रश्नावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात मंथन सुरु आहे. या प्रकरणातील दुसरी सुनावणी मंगळवारी (१७ जानेवारी) पार पडली. १० जानेवारीच्या सुनावणीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युक्तीवाद केला होता. तर आजच्या सुनावणीत शिवसेना (UBT) गटाने युक्तीवाद केला. यानंतर आता याप्रकरणातील पुढची सुनावणी २० […]

Mumbaitak
follow google news

shivsena symbol thackeray group objects to shinde group 7 district chief

हे वाचलं का?

अकोला : शिवसेना कोणाची? या प्रश्नावर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात मंथन सुरु आहे. या प्रकरणातील दुसरी सुनावणी मंगळवारी (१७ जानेवारी) पार पडली. १० जानेवारीच्या सुनावणीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने युक्तीवाद केला होता. तर आजच्या सुनावणीत शिवसेना (UBT) गटाने युक्तीवाद केला. यानंतर आता याप्रकरणातील पुढची सुनावणी २० जानेवारीला होणार आहे. (shivsena party symbol election commission hearing thackeray group objects to shinde group 7 district chief)

आजच्या सुनावणीत काय काय घडलं?

आजच्या सुनावणीत शिंदे-ठाकरे गटाने एकमेकांचे दावे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाच्या वतीने अॅड. कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला. तर शिंदे गटाच्या वतीने अॅड. महेश जेठमलानी यांनी बाजू मांडली. यावेळी ठाकरे गटाच्यावतीने शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे हे ७ जिल्हाप्रमुख शिंदेंना अडचणीत आणणार का? असा सवाल विचारला जात आहे.

कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद :

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयापर्यंत प्रतिक्षा करा

  • शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता आहे

  • ठाकरे गट हीच खरी शिवसेना आहे

  • शिंदे गटाने सादर केलेली प्रतिज्ञापत्रं ही बोगस आहेत

  • धनुष्यबाण चिन्हाचा निर्णय आत्ता नकोच

  • काही लोकांना पक्षातून घेऊन बाहेर पडणं हे बेकायदेशीर आहे

  • निवडणूक आयोगाने सर्व बाजू तपासण्याची गरज आहे

  • सर्व कागदपत्रांची छाननी करणे गरजेचे आहे

  • पक्षाच्या चिन्हावरच आमदार निवडून आले

  • शिंदे नगरविकास मंत्री असताना गप्प का होते?

  • मुळ पक्ष वेगळा असतो, लोकप्रतिनिधी वेगळे असतात

  • पक्षांतर्गत निवडणुकीसाठी अजून मुदतवाढ द्या

  • कागदपत्रांच्या छाननीसाठी ओळखपरेड करा

  • आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेवर निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला नाही. म्हणजे आमची पक्षाची घटना कायदेशीर आहे.

  • पक्षाची घटना ही योग्यच आहे. तिला आव्हान देता येऊ शकत नाही

महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद :

  • पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय?

  • आमच्याकडे संख्याबळ जास्त

  • संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा.

  • आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचा युक्तीवाद चुकीचा आहे.

  • ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही.

  • मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे.

  • चिन्हासाठी बहुमत आवश्यक, शिंदे गटाकडे बहुमत आहे.

ठाकरे गटाकडून शिंदेंच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप :

दरम्यान, आजच्या सुनावणीमध्ये ठाकरे गटाच्या वतीने शिंदे गटाच्या ७ जिल्हाप्रमुखांवर आक्षेप घेण्यात आले. या ७ जिल्हाप्रमुखांच्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा ठाकरे गटाने केला. ज्या लोकांवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये विजय चौगुले, राजाभाई केणी, चंद्रकांत रघुवंशी, किरसिंग वसावे, नितीन मते यांच्यासह शिंदे गटाच्या आणखी दोन जिल्हा प्रमुखांवर आक्षेप घेण्यात आला आहे. वेगवेगळ्या पदांवर असतानाही या नेत्यांना जिल्हाप्रमुखपदी दाखविण्यात आल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

    follow whatsapp