शरद पवार राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल, नियती सूड उगवेल : शिवतारेंच्या टार्गेटवर फक्त पवार!

मुंबई तक

• 10:20 AM • 09 Oct 2022

मुंबई : ठाकरे-शिंदे वादाच्या पार्श्वभूमीवर अखेरीस निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले आहे. त्यानंतर दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांना जबाबदार धरुन टीका करताना दिसत आहेत. सोबतच ठाकरे गटातील नेते भाजपला लक्ष्य करत आहेत. तर त्याचवेळी शिंदे गटातील नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : ठाकरे-शिंदे वादाच्या पार्श्वभूमीवर अखेरीस निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवले आहे. त्यानंतर दोन्ही गटातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दोन्ही गटातील नेते एकमेकांना जबाबदार धरुन टीका करताना दिसत आहेत.

हे वाचलं का?

सोबतच ठाकरे गटातील नेते भाजपला लक्ष्य करत आहेत. तर त्याचवेळी शिंदे गटातील नेते राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबाबदार धरत आहेत. दरम्यान, या निर्णयावरुनच आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केले आहे. पण यावेळी पवार यांच्यावर टीका करताना शिवतारे सलग २० मिनिटे टीका करत होते.

शिवतारे म्हणाले, निवडणूक आयोगाचा निर्णय पवार साहेबांना अपेक्षित होता. दोन दिवसांपूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं. जो निर्णय येईल त्याचं स्वागत केलं पाहिजे. हे मोठे लोकं कुठे, काय गेम करतील काही सांगता येत नाही. शिवसेना संपवायला शरद पवार जबाबदार आहेत. सगळा दोष पवार साहेबांचा आहे. यातुन त्यांना स्वतःचा फायदा करून घ्यायचा आहे.

2014 मध्ये शरद पवार यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. तो कट त्यांचाच होता. शिवसेना-भाजप संसार पवार साहेबांना चालू द्यायचा नव्हता, असा आरोप शिवतारे यांनी केला. तसेच पवार यांनी कधीच शिवसेनेशी मिळवून घेतलं नाही. पवार यांची मैत्री हिंदूह्रदयसम्राट यांच्याशी असली तरी राजकीय मतभेद होते. 2019 ला एका खुर्चीच्या मोहापाय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना संपवत उद्धव ठाकरे त्यांच्याकडे जाऊन बसले, असेही ते म्हणाले.

शरद पवार राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल :

विजय शिवतारे म्हणाले, शरद पवार राज्याच्या राजकारणातील बर्म्युडा ट्रँगल आहेत. बरमुडा ट्रँगलजवळ कोणतेही जहाज, कोणतेही विमान, कोणीही गेले तरी ते नामषेश होतात, असे म्हटले जाते. अगदी तसेच शरद पवारांजवळ जे गेले ते सगळे संपले. त्याबाबत तुम्ही इतिहास पहा. 2019 साली एकही उमेदवार नसताना राज ठाकरे यांना पुढे करत लाव रे तो व्हिडीओ म्हणायला लावलं. राज ठाकरे यांची गरज संपली की त्यांना झटकून टाकले.

उद्धव ठाकरेंच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार-अजित पवारांनी घेतला :

उद्धव ठाकरे यांच्या भोळेपणाचा फायदा शरद पवार आणि अजित पवार यांनी घेतला. शरद पवार यांचा डाव काल यशस्वी झाला. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते, काँग्रेस पंचसूत्री गाडा आणि माझ्यानंतर उद्धव आणि आदित्यला सांभाळा. याची आठवण कोणाला आता होत नाही. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. शरद पवार साहेब नियती तुमच्यावर सूड उगवेल. महाराष्ट्राच्या भावना तुम्ही दुखावल्या आहेत, असेही शिवतारे म्हणाले.

काँग्रेस राष्ट्रवादी युती तोडा हे सांगायला 16 आमदार आल्यानंतर आमदारांना काय बोलले, तुम्हाला जायच असेल तर तुम्ही पण जा. काँग्रेस राष्ट्रवादी यांनी काय भानामती केली काय माहित. शरद पवार आणि उद्धव ठाकरे या कटकारस्थानाला जबाबदार, पुत्रप्रेम पुढचा भाग आहे. पण याला जबाबदार पवार आहेत. उद्धव ठाकरे जेवढे जबाबदार तेवढे पवार जबाबदार, पण हा पवाराचा डाव होता, असे म्हणतं शिवतारे यांंनी पवारांना लक्ष्य केले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मी आमदार आणि मंत्री झालो. पवार साहेब यांनी जसा पाठिंबा दिला तसा आम्हाला कोणाचा पाठिंबा नको आहे. आम्ही 50 आमदार आहोत. लढू आम्ही शिवसेना नाव परत घेऊ, 2019 लाच शिवसेनेच अधपतनाकडे गेली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठक बोलावली आहे. तिकडे जाणार आहे, बाळासाहेब यांची शिवसेना राहिली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेना एक विचार असून आम्ही विचारांचे वारसदार आहोत आणि ते पुढे घेऊन जाणार आहोत, असाही निर्धार शिवतारे यांनी बोलून दाखविला.

    follow whatsapp