ADVERTISEMENT
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यात आज पहाटे निधन झालं. छत्रपती शिवरायाचा इतिहास अजरामर करणारं सोनेरी पान काळाच्या पडद्याआड गेलं आहे त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली
बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहास आणि संस्कृतीच्या विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.नव्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याशी जोडल्याबद्दल त्यांचे आपण सदैव ऋणी राहू– पंतप्रधान नरेंद्र मोदी
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने महाराष्ट्राने साहित्य, कला क्षेत्रातील अध्वर्यू गमावला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!- शरद पवार
इतिहास संशोधक, शिवचरित्रकार, महाराष्ट्र भूषण सन्माननीय बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विनम्र श्रद्धांजली ! राज ठाकरे
शिवचिंतनात रमलेला असा शिवआराधक शोधून सापडणार नाही. या अलौकिक शिवसाधकाने शिवरायांच्या स्तुतीसाठीच प्रयाण केले असावे, भावपूर्ण श्रद्धांजली- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली, भावपूर्ण श्रद्धांजली-अमित शाह
ध्येयाप्रति समर्पित व्यक्तिमत्त्व, वेळ-शब्दांचे पक्के, सतत राष्ट्रनिर्माणाचा विचार, संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी कठोर परिश्रम असे बाबासाहेब पुरंदरे आता पुन्हा होणे नाही. एक महान कर्मयोगी आपल्यातून निघून गेले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! देवेंद्र फडणवीस
शिवअभ्यासक आणि ऋषीतुल्य व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली आहे, भावपूर्ण श्रद्धांजली-मोहन भागवत, सरचंघचालक
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक, आमच्या कुटुंबातले एक घटक आदरणीय सन्माननीय, पूज्य शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर जे दुःखाचं सावट आलेलं आहे, त्यात मी आणि माझे सर्व कुटुंबीय सहभागी आहोत. मी प्रार्थना करतो की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो-उदयनराजे भोसले
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आज दुःखद निधन झाले. साहित्य, नाट्यक्षेत्रात महत्वपूर्ण योगदान लाभलेलं अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्व आपल्यामधून हरपले. भावपूर्ण श्रद्धांजली-डॉ. अमोल कोल्हे
ADVERTISEMENT