डोंबिवलीत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका माणसाने त्याच्या पत्नीला आणि मुलींना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळलं. या घटनेत या तिघीही गंभीर भाजल्या. त्यांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या तिघींचाही मृत्यू झाला. प्रसाद पाटील असं या माणसाचं नाव आहे. त्याने या घटनेनंतर पोलीस ठाण्यात जाऊन घराला आग लागली होती आणि त्या आगीत या तिघी भाजल्या असा बनाव रचला. मात्र पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर ही सगळी माहिती समोर आली. प्रसादने त्याची पत्नी प्रीती आणि मुली समीरा आणि समीक्षा यांना जाळलं.
ADVERTISEMENT
प्रसाद पाटील त्याच्या पत्नीला मारहाण करायचा
मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी प्रसाद पाटीलच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. डोंबिवलीतल्या भोपर या ठिकाणी प्रसाद पाटील त्याच्या पत्नीसह आणि दोन मुलींसह राहात होता. मात्र तो त्याच्या पत्नीचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होता. तसंच नाही तर पत्नी प्रीतीला तो मारहाणही करत असे.
प्रसाद पाटीलने रचला बनाव
प्रसाद पाटीलने घरात वाद झाल्यानंतर त्याच्या पत्नीला म्हणजेच प्रीती आणि समीरा तसंच समीक्षा या तिघींच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवलं. या घटनेत या तिघी गंभीररित्या भाजल्या. यानंतर प्रसाद पाटीलने पोलीस ठाण्यात जाऊन बनाव रचला आणि आपल्या घराला आग लागली असंही सांगितलं. तसंच या घटनेत पत्नी आणि मुली भाजल्या असंही पोलिसांना सांगितलं.
हा सगळा प्रकार शनिवारी घडल्यानंतर या भाजलेल्या या तिघींना म्हणजेच प्रीती, समीरा आणि समीक्षा या तिघींना रूग्णालयात दाखल केलं. रविवारी सकाळी या तिघींचाही मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी मानपाडा पोलीस कर होते. त्यांना प्रसाद पाटीलवर संशय आला. यानेच हे कृत्य केलं असावं असं पोलिसांना वाटलं. त्यामुळे त्याची कसून चौकशी पोलिसांनी केली. ज्यानंतर त्याच्यावर कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी किशोर पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी प्रसादच्या विरोधात ३०२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. प्रसाद पाटीलवरही रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस पुढील तपासही करत आहेत.
ADVERTISEMENT