गडचिरोली: दोन वर्षांपूर्वी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल (8 मार्च) रोजी सकाळी नवेगाव येथील आत्मसमर्पितांच्या वसाहतील घडली आहे.
ADVERTISEMENT
नकुल मट्टामी (35) रा. राजनांदगाव असे मृतकाचे नाव आहे. तो व त्याची पत्नी दोघेही नक्षल दलममध्ये कार्यरत होते. 2019 मध्ये दोघांनीही गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. हे जोडपे गडचिरोली शहराजवळ असलेल्या नवेगाव येथील आत्मसमर्पित नक्षलवाद्यांसाठी बांधून दिलेल्या नवजीवन वसाहती मधील घरात राहत होते.
मंगळवार (8 मार्च) वसाहतीजवळ असलेल्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृत नकूल मट्टामीला तीन मुले आहेत. कौटुंबिक कारणातून मानसिक संतुलन बिघडल्याने त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.
नवजीवन वसाहतील सर्व आत्मसमर्पित नक्षलवादी राहतात. त्यांना उपजिवीकेचे नवीन साधन मिळावे म्हणून पोलीस विभागाच्या वतीने विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यातून अनेकांनी स्वयंरोजगार सुरू केला आहे.
आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी उभारला फिनाईल निर्मितीचा उद्योग
जी पावलं कधी काळी हिंसक चळवळीच्या चिखलात रूतली होती. त्या पावलांनी आज उद्योग क्षेत्रात नव्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. हे शक्य झालं गडचिरोली पोलिसांच्या आत्मसमर्पण नवजीवन योजनेमुळे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सन्मानाने जगता यावे यासाठी ‘नवजीवन’ योजनेच्या माध्यमातून त्यांना फिनाईल उत्पादनाचे नवे बळ प्राप्त झाले आहे. गडचिरोली पोलिसांच्या सहकार्याने 11 आत्मसमर्पित महिलांनी फिनाईल निर्मिती उद्योग चालू केला असून आर्थिक सक्षमतेकडे नवे पाऊल टाकले आहे.
या महिलांनी वर्धा येथील एम गिरी संस्थेत प्रशिक्षण घेत नवजीवन उत्पादक संघ नावानी ही संस्था उभारली. 13 नोव्हेंबरला याचे उदघाटन झाले आणि त्यांना 1100 लिटर फिनाईलचे ऑर्डर सुद्धा पोलीस विभागाने दिले आहे.
या उद्योगतील आत्मासमर्पित महिला नक्षल पूर्वी जंगलात राहून हिंसक कारवायात सक्रिय होत्या. एकेदिवशी या निरर्थक जीवघेण्या जीवनाला कंटाळून त्यांनी आत्मासमर्पण केलं. केंद्र शासन व राज्य शासनाच धोरण आहे ज्या नक्षलवादी आत्मसमर्पण करतात त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस विभागही शक्य ते सहकार्य करून नवे जीवन देण्याचे कार्य करत आहे.
‘क्लीन 100’ या नावाने असलेल्या या फिनाईलला प्रायोगिक तत्वावर सरकारी कार्यालयांकडून ऑर्डर मिळाली आहे. पुढे घरगुती वापरासाठी देखील मार्केटमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. या संघाची अध्यक्ष पूर्वी नक्षल्यांची कमांडर होती. जवळपास 10 वर्ष तिने चळवळीत काढली.
गडचिरोली : आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची गोळी झाडून आत्महत्या; पोलीस दलात खळबळ
मात्र आत्मसमर्पणामुळे त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहे. कधी काळी जंगलात भटकावं लागायचं, आता, मात्र नक्षल्यांना कुटुंब आहे. हाताला काम आहे, मुख्य प्रवाहात आल्यामुळे सन्मानाने जगायला मिळतं आहे. हा फिनाईल निर्मितीचा उद्योग आत्मसमर्पित नक्षल्यांसाठी बनविण्यात आलेल्या नवजीवन वसाहतीत सुरु करण्यात आलं आहे.
ADVERTISEMENT