Shraddha Walker new photo : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात एक जुना फोटो समोर आलाय. त्यामुळे आफताब पूनावालाने श्रद्धा वालकरवर केलेल्या अत्याचाराची आणखी एक गोष्ट समोर आली आहे. फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा झालेल्या असून, तिच्या मित्रांनीही याबद्दल माहिती दिलीये.
ADVERTISEMENT
श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी आफताब पूनावाला सातत्यानं दिल्ली पोलिसांची दिशाभूल करत आहे. वेगवेगळी माहिती देऊन तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न आफताबकडून केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलीस आफताब पूनावालाविरोधात पुरावे गोळा करत असतानाच श्रद्धाचा जुना फोटो समोर आलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकरचा हा फोटो 2020 मधील आहे. आफताब पूनावालाने श्रद्धाला मारहाण केली होती. त्यानंतरचा हा फोटो आहे.
Shraddha Murder Case : घरभाडे करार ते पाण्याचं बिल… 5 व्यक्तींचे जबाब आफताबला अडकवणार!
आफताबने श्रद्धा वालकरला बेदम मारहाण केली होती. ज्यामुळे तिला रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. श्रद्धावर तीन दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते. आफताबने मारहाण केल्यामुळे श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या होत्या. त्या या फोटोत दिसत आहेत.
श्रद्धा वालकरच्या मित्राने काय सांगितलं?
इंडिया टुडेशी बोलताना श्रद्धा वालकरचा मित्र गोडविन म्हणाला, ‘सुरूवातीला आफताबने लग्न करण्याचं वचन श्रद्धाला दिलं होतं. नंतर श्रद्धाला असं कळलं की तो खूप व्यसनाधीन आहे. आफताबच्या आईवडिल श्रद्धाला म्हणत होते की, जर तू त्याच्यासोबत राहिली, तर तू मानसिक रोगी होऊन जाशील. तू एकटी आहेस, जी इतका काळ आफताबसोबत राहिली आहेस. तू जर त्याच्यासोबत लग्न केलं, तर तो चांगला माणूस बनेल.’
Shraddha Murder Case : 10 तासांत श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताबने बिअर घेतली अन्…
आफताबने श्रद्धाला 14-15 वेळा केली होती मारहाण
श्रद्धाचा मित्र गोडविन यांने आणखी एक गंभीर आरोप केलाय. ‘आफताबने श्रद्धाला मारहाण केल्याची घटना 2020 मध्ये झाली होती, पण श्रद्धाने सांगितल्यानुसार तिच्यासोबत असे प्रकार 14-15 वेळ झाली होती’, असं त्याने सांगितलं.
‘श्रद्धा मला सांगत होती की, आफताब आठवड्याच्या शेवटी ड्रग्ज घ्यायचा. तो ब्राऊनी बनवून विकायचा. ब्राऊनी फ्रीजमध्ये ठेवायचा. आफताब मध्यरात्री ड्रग्ज पुरवायचा. श्रद्धाला ही गोष्ट आवडत नव्हती’, असंही श्रद्धाचा मित्र गोडविनने सांगितलं.
Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले
गोडविनने सांगितलं की, ‘श्रद्धाचा जो फोटो आता समोर आलाय, तो नंतरचा आहे. जेव्हा ती माझ्याशी बोलली होती. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. तसेच गळा दाबल्याचीही खूण होती. आफताब चुकीच्या पद्धतीने पैसे कमावत होती. आफताब तिच्याकडे पैसे मागायचा’, असंही गोडविनने सांगितलं.
ADVERTISEMENT