‘तुझे तुकडे करून फेकून देईन म्हणतोय’, श्रद्धाने 2 वर्षांपूर्वीच केली होती आफताबची तक्रार

दिव्येश सिंह

23 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:47 AM)

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी महत्त्वाचा खुलासा झालायं. आफताब पूनावाला श्रद्धा वालकरला सातत्यानं मारहाण करत होता, याला दुजोरा देणारा एक तक्रार अर्ज समोर आल्यानं आफताबच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रद्धा वालकरने 2020 मध्ये पोलिसांकडे आफताबची तक्रार केली होती. श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात आफताब तुकडे तुकडे करून फेकून देईन अशी धमकी देत असल्याचा उल्लेख आहे. श्रद्धा […]

Mumbaitak
follow google news

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आणखी महत्त्वाचा खुलासा झालायं. आफताब पूनावाला श्रद्धा वालकरला सातत्यानं मारहाण करत होता, याला दुजोरा देणारा एक तक्रार अर्ज समोर आल्यानं आफताबच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रद्धा वालकरने 2020 मध्ये पोलिसांकडे आफताबची तक्रार केली होती. श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात आफताब तुकडे तुकडे करून फेकून देईन अशी धमकी देत असल्याचा उल्लेख आहे.

हे वाचलं का?

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब अमीन पूनावाला विरुद्ध पोलिसांच्या हाती आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळाला आहे. आफताब पूनावाला श्रद्धा वालकरला सुरूवातीपासून मारहाण करत होता, हे आता एका तक्रार अर्जामुळे समोर आलंय. श्रद्धा वालकरने तुळींज पोलीस ठाण्यात आफताब विरुद्ध तक्रार दिली होती.

23 नोव्हेंबर 2020 रोजी श्रद्धा वालकरने पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत श्रद्धाने म्हटलेलं आहे की, आफताब अमीन पूनावाला हा मला शिवीगाळ करून मारहाण करतोय. आज त्याने गळा दाबून माझी हत्या करण्याचा प्रयत्न केलाय,” असं या तक्रारीत श्रद्धा म्हणतेय.

श्रद्धा वालकरला का मारलं? : न्यायाधीशांच्या प्रश्नाला आफताबने काय उत्तर दिलं?

“तो मला धमकी देतोय की, माझे तुकडे तुकडे करून फेकून देईन. मागील सहा महिन्यांपासून तो मला मारहाण करतोय. मला जिवे मारण्याची धमकी देत असल्यानं पोलिसांत तक्रार देण्याचं माझं धाडस होत नव्हतं,” असंही श्रद्धाने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

पुढे श्रद्धा वालकर तक्ररीत म्हणतेय की, “आफताब मला मारहाण करतो. माझ्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या प्रकाराची त्याच्या कुटुंबियांनाही माहिती आहे. आता त्याच्यासोबत राहण्याची माझी इच्छा नाहीये. तो मला ब्लॅकमेल करतोय. त्यामुळे माझं काही बरंवाईट झालं तर त्याला तोच जबाबदार असेल”, असंही श्रद्धाने दोन वर्षापूर्वी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे.

Shraddha Murder: तीनवेळा झालं होतं आफताब आणि श्रद्धाचं ब्रेकअप, त्यावेळीही करायचा मारहाण

श्रद्धा वालकरचं पत्र आफताब पूनावालाविरुद्ध ठरणार महत्त्वाचा पुरावा

श्रद्धा वालकरने दोन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीमुळे आफताब पूनावालाविरुद्ध एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. श्रद्धाने तक्रारीत आफताब पूनावालाचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे तुकडे तुकडे करून फेकून देईन अशी धमकीही आफताब देतो असा उल्लेख तक्रारीत असल्यानं आणि आफताबने तसंच कृत्ये केलेलं असल्यानं आता त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

मूळची वसईची असलेली श्रद्धा वालकर आफताब पूनावालासोबत दिल्लीत लिव्ह-इन मध्ये राहत होती. 18 मे रोजी आफताब पूनावालाने तिची गळा दाबून हत्या केली. मेहरौलीत भाड्यानं घेतलेल्या फ्लॅटमध्ये ही घटना घडलेली आहे.

Shraddha murder case: आफताबच्या घराच्या बाथरूममध्ये आढळलं रक्त, फॉरेन्सिक टीमचा मोठा खुलासा

क्रूरपणा म्हणजे आफताब पूनावालाने श्रद्धाला संपवल्यानंतर तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. ते त्याने दररोज मेहरौलीच्या जंगलात नेऊन फेकले. लग्न करण्याचा तगादा लावल्यानं रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचं आफताबने म्हटलंय. सध्या तो पोलीस कोठडीत असून, श्रद्धाच्या जुन्या तक्रारीमुळे सुरूवातीपासूनच तो श्रद्धाचं शारीरिक शोषण करत होता, हे समोर आलंय.

    follow whatsapp