पालघर : मुंबईत प्रेम… दिल्लीत गेल्यावर गर्लफ्रेंडचे केले तुकडे; तरुणीच्या हत्येचं कसं उलगडलं गूढ?

मुंबई तक

14 Nov 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:03 AM)

मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करत असताना दोघं प्रेमात पडले. नंतर दोघंही दिल्लीत गेले. दोघंही लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहायला लागले. दरम्यान, काही महिने लोटल्यानंतर श्रद्धा वालकरच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर प्रियकरांने श्रद्धासोबत केलेल्या क्रूरकृत्याची कबुली दिली. एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी हादरवून टाकणारी घटना समोर आलीये. मे २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा उलगडा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबईत कॉल सेंटरमध्ये काम करत असताना दोघं प्रेमात पडले. नंतर दोघंही दिल्लीत गेले. दोघंही लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहायला लागले. दरम्यान, काही महिने लोटल्यानंतर श्रद्धा वालकरच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर प्रियकरांने श्रद्धासोबत केलेल्या क्रूरकृत्याची कबुली दिली.

हे वाचलं का?

एखाद्या चित्रपटाची पटकथा वाटावी अशी हादरवून टाकणारी घटना समोर आलीये. मे २०२२ मध्ये झालेल्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश आलंय. प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करणाऱ्या आरोपी प्रियकराचं नाव आफताब अमीन पूनावाला असं आहे. हत्येचा खुलासा झाल्यानंतर पोलिसांनी आफताब अमीन पूनावाला याला अटक केलंय.

श्रद्धा वालकर आणि आफताब अमीन पूनावाला दोघेही पालघर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. श्रद्धाचे वडील विकास मदान वालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये कामाला होती. तिथेच आफताब अमीन पूनावाला आणि श्रद्धाची भेट झाली.

श्रद्धा आणि आफताब एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर आफताब आणि श्रद्धा मुंबईतून दिल्लीत राहायला गेले. दिल्लीत राहायला गेल्यानंतर श्रद्धाने आफताबकडे लग्नाचा तगादा लावला. राग आल्यानं आफताबने श्रद्धाची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात नेऊन फेकले.

श्रद्धा वॉकर हत्या प्रकरण : काय घडलं?

श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी सांगितलं की, ते कुटुंबासह पालघर येथे राहतात. श्रद्धा वालकर मुंबईतल्या मालाड भागात बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये काम करत होती. तिथे आफताबच्या प्रेमात पडल्यानंतर दोघे लिव्ह-इन मध्ये राहू लागले.

श्रद्धा वालकरच्या प्रेमसंबंधाबद्दल तिच्या कुटुंबियांना कळलं. त्यानंतर कुटुंबियांनी याला विरोध केला. कुटुंबियाचा विरोध झुगारून श्रद्धा मुंबई सोडून आफताबसोबत दिल्लीला निघून गेली.

श्रद्धा वॉकरच्या खुनाचा उलगडा कसा झाला?

श्रद्धा वालकर दिल्लीत गेल्यानंतर तिच्या कुटुंबियाचा तिच्याशी संपर्क होत होता. ती महरौली भागातील छतरपूर परिसरात राहत होती. विकास वालकर सांगतात, श्रद्धाबद्दल माहिती मिळत राहायची, पण मे नंतर माहिती मिळणं बंद झालं. कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण लागला नाही.

विकास वालकर यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर ते जिथे श्रद्धा वालकर राहायची त्या फ्लॅटवर गेले. त्या फ्लॅटला कुलूप लावलेलं होतं. त्यांनी थेट महरौली पोलीस ठाणे गाठलं आणि मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी लागलीच गुन्हा दाखल करून घेतला.

पोलिसांनी तपास करत अखेर शनिवारी आफताब अमीन पूनावालाला शोधून काढलं. पोलिसांनी त्याची चौकशी केली. चौकशीतून आफताबने केलेले खुलासे ऐकून पोलीसही हादरले.

आफताब अमीन पूनावालाने पोलिसांना सांगितलं की, त्यांच्यामध्ये लग्नावरून वाद होत होते. श्रद्धा त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होती. त्यामुळे १८ मे रोजी त्याने श्रद्धाची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले आणि दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात ते फेकले. सध्या आफताब पोलीस कोठडीत असून, पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.

    follow whatsapp