श्रद्धा वालकरची हत्या करणाऱ्या आफताब अमीन पूनावालाबद्दल नवीन माहिती समोर आलीये. पोलीस चौकशीत त्याने गुन्ह्यांची कबूली देताना धक्कादायक माहिती दिलीये. श्रद्धाच्या हत्येनंतर आफताब नवीन मुलीला डेट करत होता. तो तिलाही घरी घेऊन येत होता, असंही चौकशीतून समोर आलंय.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड आफताब अमीन पूनावाला याला अटक केलीये. त्याची सध्या चौकशी सुरू असून, त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबूली दिलीये.
श्रद्धाची हत्या केल्यानंतर डेटिंग करत होतो आणि मुलीला घरीही घेऊन आलो होतो, अशी माहितीही त्याने पोलीस चौकशीत दिलीये. आफताब पूनावाला ज्या मुलीला डेट करत होता आणि घरी घेऊन आला होता, मानसोपचार तज्ज्ञ होती, असंही सूत्रांनी सांगितलं.
shraddha walker Murder :”मला वाचवा, नाहीतर तो मारून टाकेल”, श्रद्धाच्या मदतीला मित्रही धावले, पण…
दिल्ली पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने तीन महिन्यांपर्यंत श्रद्धा वालकरच्या मृतदेहाचे तुकडे घरात लपून ठेवले होते. तो पुरावे नष्ट करत होता. हत्या केल्यानंतर आफताब पूनावाला नेहमीप्रमाणे राहत होता. त्याने मोबाईलवर बंबल डेटिंग अॅप इन्स्टॉल केलं होतं.
याच डेटिंग अॅपवर आफताप पूनावालाची भेट एका तरुणीसोबत झाली. ही तरुणी मानसोपचार तज्ज्ञ होती आणि जून-जुलै मध्ये एक ते दोन वेळा ती आफताबच्या फ्लॅटवर आली होती. ज्यावेळी ही तरुणी घरी आली होती, तेव्हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीज आणि किचनमध्ये लपवलेले होते, अशी माहिती समोर आलीये.
” ….तर आज श्रद्धा जिवंत असती ” हत्या झालेल्या मुलीच्या आठवणीत वडील ढसाढसा रडले
आफताबने श्रद्धाची हत्या कधी केली?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीप्रमाणे दिल्लीत गेल्यानंतर आफताब आणि श्रद्धाचे सारखे वाद होते. लग्न करण्याच्या विषयावरून वाद होत होते. पोलिसांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार आफताब पूनावालाने गळा दाबून श्रद्धा वालकरची हत्या केली.
१८ मे रोजी वाद झाल्यानंतर आफताब श्रद्धाच्या छातीवर बसला आणि गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्यानंतर त्याने श्रद्धाचा मृतदेह बाथरूममध्ये ठेवून दिला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट आणि पुरावे नष्ट करण्याबद्दल इंटरनेटवरून माहिती घेतली.
दुसऱ्या दिवशी इलेक्ट्रिक कटरच्या मदतीने आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले आणि रक्ताचे डाग डागलेले कपडे कचरा गाडीत टाकून दिले. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलेले मृतदेहाचे तुकडे त्याने वेगवेगळ्या भागात फेकले.
ADVERTISEMENT