रात्रंदिवस काम केलं, कष्ट उपसले.. पण शिक्षण नाही सोडलं, 10वीच्या परीक्षेत 35 टक्के मिळवले!

मुंबई तक

• 03:11 PM • 17 Jun 2022

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (17 जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी राज्याचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यावेळी पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाले आहे. […]

Mumbaitak
follow google news

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज (17 जून) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन जाहीर झाला. यावेळी राज्याचा निकाल 96.94 टक्के इतका लागला आहे. यावेळी पुण्यातील भवानी पेठेत राहणारा आणि रमणबाग शाळेतील शुभम राहुल जाधव या विद्यार्थ्याला इयत्ता दहावीमध्ये सर्व विषयामध्ये 35 गुण मिळाले आहे.

हे वाचलं का?

तसेच त्याच्या सर्व गुणांची टक्केवारी 35 टक्के इतकी झाली आहे. त्यामुळे आता त्याचे मार्क सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. दरम्यान, शुभमच्या परिसरातील नागरिकांनी पुणेरी पगडी आणि पेढे देऊन अभिनंदन केलं आहे.

आता मला पोलीस व्हायचंय: शुभम जाधव

‘माझ्या घरची परिस्थिती हलाखीची असून वडील पाण्याच्या टाक्या दुरुस्तीच करतात. तर आई धुणीभांडी करण्याचं काम करते. माझ्या दहावीच्या शिक्षणाचा खर्च आई वडिलांवर नको म्हणून, मी हार्डवेअरच्या दुकानात काम करायचो.’ असं म्हणत शुभम जाधवने आपली घरची परिस्थिती बेताची असतानाही शिक्षण घेत असल्याची माहिती दिली.

‘मागील वर्षभर शाळा आणि काम करून दहावीची परीक्षा दिली. त्या कामातून महिन्याला 6 हजार पगार मिळतो. यामधून घराला थोडासा हातभार लागत आला आहे.’

‘आज दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार होता. मी 1 वाजता निकाल पहिला तर त्यामध्ये 35 टक्के पडले असल्याचे दिसले. माझा नंबर टाईप करताना काही चूक झाली का असे वाटले. पुन्हा मित्राच्या मोबाइलमध्ये टाइप केल्यावर 35 टक्के दिसून आले. मग खात्री झाली की, मला 35 टक्के मिळाले.’

‘या मार्कची माहिती आई वडीलांना दिली. दोघांना देखील खूप आनंद झाला. पण मला या परीक्षेत 50 ते 55 टक्के मिळतील असा अंदाज होता. पण कामामुळे मार्क कमी पडले. 9वीमध्ये मला 67 टक्के होते. पण आता बारावीमध्ये 50 टक्यांपेक्षा अधिक पडायचे आहेत आणि पोलीस व्हायचं आहे.’ असं स्वप्नं असल्याचे शुभम जाधव याने सांगितलं.

SSC result 2022: राज्याचा निकाल ९६.९४ टक्के, कोकण विभाग अव्वल, मुलींची बाजी…

आता शुभमने पोलीस व्हावे, त्याचे स्वप्नं पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करणार: राहुल जाधव

‘मी दुपारी कामावर असताना शुभमचा फोन आला की, दहावीच्या परीक्षेत 35 टक्के मिळाले आहेत. मला त्याच्या फोनवर विश्वास बसला नाही. शुभमला 9वीमध्ये 67 टक्के होते. त्यामुळे त्याला त्यापेक्षा अधिक टक्के मिळतील, असे वाटत होते. पण घरची परिस्थिती नसल्यामुळे तो कामावर जात होता. त्यामुळे त्याचा अभ्यास कमी झाल्याने त्याला 35 टक्के मिळाले.’ असं शुभमचे वडील राहुल जाधव यांनी सांगितलं.

‘एवढं काम करून तो पास झाला आहे. त्याबद्दल मला आनंद आहे. आता पुढील शिक्षण घेऊन परीक्षेत चांगले मार्क घ्यावेत आणि पोलीस होण्याचं स्वप्नं पूर्ण करावे. आम्ही त्याचे स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार.’ असं शुभमचे वडील राहुल जाधव यांनी सांगितले.

    follow whatsapp