मुंबई: बिग बॉस 13 विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा अंत्यविधी आज (3 सप्टेंबर) मुंबईत होणार आहे. सिद्धार्थचा गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असल्याचं प्राथमिक वृत्त आहे. मात्र त्याच्या शवविच्छेदनाच्या अंतिम अहवालानंतरच नेमकं काय कारण आहे हे समजू शकणार आहे.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन मुंबईतील कूपर रुग्णालयात करण्यात आले आहे. जेणेकरून अभिनेत्याच्या मृत्यूचे नेमकं कारण समोर येईल. सिद्धार्थच्या शवविच्छेदनाचा अहवाल कूपर हॉस्पिटलद्वारे थोड्याच वेळात जारी केला जाणार आहे. सिद्धार्थचे शवविच्छेदन 5 डॉक्टरांच्या पथक तसेच पोलीस देखरेखीखाली आणि इनकॅमेरा करण्यात आलं आहे.
मनोरंजन क्षेत्रात सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक जाण्याने एकच मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. दरम्यान, आज त्याच्यावर अंत्य संस्कार करण्यात येणार आहे. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक जण उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.
सिद्धार्थ शुक्लावर अंतिम संस्कार आज दुपारी 12 वाजेनंतर होणार असल्याचं समजतं आहे. त्याचं पार्थिव ओशिवरा येथील त्यांच्या घरी नेण्यात येईल आणि त्यानंतर तेथील स्मशानभूमीत त्याचे अंतिम संस्कार केले जातील. सांगितले जात आहे की, ब्रह्मकुमारीमध्ये परवानगी नसल्यामुळे ओशिवरामध्येच अंतिम संस्कार केले जात आहेत.
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सिद्धार्थ शुक्लाच्या घराला बॅरिकेड केले आहे. त्याच्या घराजवळ जाण्यासाठी कोणालाही परवानगी दिली जात नाहीय. येथील सुरक्षा व्यवस्थित राहावी यासाठी पूर्ण लक्ष दिले जात आहे.
सिद्धार्थ शुक्लावर अंत्यसंस्कार आज 12 वाजेनंतर केले जाणार असल्याने थोड्याच वेळात, सिद्धार्थचे कुटुंबीय सकाळी 9.30 ते 10 च्या दरम्यान त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कूपर हॉस्पिटलमध्ये जाणार आहेत. त्याचे कुटुंबीय प्रथम सिद्धार्थचे पार्थिव घरी नेतील आणि नंतर तिथून बारा वाजेच्या सुमारास अंत्ययात्रा निघणार आहे.
Sidharth Shukla मृत्यू प्रकरणात आत्तापर्यंत कुठलाही Foul Play नाही, पोलीस सूत्रांची माहिती
मॉडेलिंगने केली होती करिअरची सुरुवात
12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2008 मध्ये, तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही मालिकेत सर्व प्रथम छोट्या पडद्यावर झळकला होता. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या मालिकेतूनच मिळाली. ज्यामुळे तो घरोघरी पोहचला.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हंपटी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला होता. तर याच वर्षी (2021) त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ नावाची वेब सीरीज देखील आली होती.
ADVERTISEMENT