बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्ला या अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या सेकंड वीक का वार मध्ये शहनाज गिलसोबत दिसला होता. त्यावेळी कुणी कल्पनाही केली नव्हती की सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूची बातमी येईल. सिद्धार्थ शुक्लाने बिग बॉस या कार्यक्रमात दिसला. त्याने एक टास्कही केला. एवढंच नाही तर शहनाज गिल आणि सिद्धार्थ डान्स रिअॅलिटी शो डान्स दिवानेमध्येही दिसला.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ शुक्ला बिग बॉसच्या सिझन 13 चा विजेता होता. एवढंच नाही तर सिद्धार्थ शुक्ला गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. बिग बॉस 13 मुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. सिद्धार्थ शुक्लाचं व्यक्तिमत्व दमदार होतं. त्याचं फॅन फॉलोईंगही तगडं होतं. सिद्धार्थ शुक्ला दुसरा वीक एंड वार मध्ये बिग बॉसमध्येच दिसला होता. ती त्याची शेवटची झलक ठरली.
शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. ज्या बिग बॉसने सिद्धार्थला प्रसिद्धी दिली, यश मिळवून दिलं दु्र्दैवाने त्याच कार्यक्रमातली त्याची झलक शेवटची झलक ठरली. सिद्धार्थ आणि शहनाज या दोघांमधली चांगली केमिस्ट्री यावेळी पाहण्यास मिळाली होती. सिद्धार्थ शुक्लाने बालिका वधू या सीरियलमध्ये शिवची भूमिका करत होता. सिद्धार्थ शुक्लाने काही सिनेमांमध्येही काम केलं होतं. काही प्रोजेक्ट येणारही होते. त्याचं करीअर ऐन भरात असताना सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं.
मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात, बॉलिवूडमध्येही चमकला
12 डिसेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या सिद्धार्थ शुक्लाने एक मॉडेल म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. 2004 मध्ये त्याने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 2008 मध्ये, तो ‘बाबुल का आंगन छोटे ना’ नावाच्या टीव्ही मालिकेत सर्व प्रथम छोट्या पडद्यावर झळकला होता. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख ही ‘बालिका वधू’ या मालिकेतूनच मिळाली. ज्यामुळे तो घरोघरी पोहचला.
टीव्ही इंडस्ट्रीमध्ये यश मिळाल्यानंतर सिद्धार्थ शुक्ला देखील बॉलिवूडकडे वळला. तो 2014 मध्ये हंपटी शर्मा की दुल्हनिया चित्रपटात दिसला होता. तर याच वर्षी (2021) त्याची ‘ब्रोकन बट ब्युटिफुल’ नावाची वेब सीरीज देखील आली होती.
ADVERTISEMENT