भारत केसरकर, सिंधुदुर्ग: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे निकाल जाहीर झाले आहेक. यावेळी अत्यंत अनपेक्षित असे निकाल हाती आले आहेत. संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयित आणि भाजपचे उमेदवार मनिष दळवी हे या निवडणुकीत अनपेक्षितरित्या विजयी झाले आहेत. तर दुसरीकडे कणकवलीचे सतीश सावंत यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेत 19 पैकी 11 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे सध्या तरी या निवडणुकीत राणेंचंच वर्चस्व असल्याचं दिसून आलं आहे.
ADVERTISEMENT
मात्र, या निवडणुकीत भाजपच्या राजन तेली यांना पराभवाचा धक्का बसला आहे. शिवसेनेच्या सुशांत नाईक यांनी त्यांचा पराभव केला आहे.
संशयित आरोपी मनिष दळवी निवडणुकीत विजयी; विलास गावडेंना धक्का
वेंगुर्ला विकास संस्थेतून भाजप पुरस्कृत मनिष दळवी यांचा विजय झाला आहे. तर महाविकास आघाडीच्या विलास गावडे यांना धक्का बसला आहे. 23 पैकी 13 मते ही मनिष दळवी यांना पडली आहेत तर 8 मते विलास गावडे यांना मिळाली आहेत. वेंगुर्ला तालुक्यातून भाजपचा हा मोठा विजय म्हणावा लागेल.
संतोष परब हल्ला प्रकरणात न्यायालयाने दळवी यांना मतदानाचा हक्क नाकारला होता. तसेच त्यांना जामीन देखील नाकारण्यात आला होता. असे असतानाही दळवी यांनी विजय मिळवला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष, नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
विकास संस्था-219
-
कुडाळ-37
विजयी – विद्याप्रसाद बांदेकर – 20 (मविआ)
प्रकाश मोर्ये – 15 ( भाजपा)
सुभाष मडव – 1 (अपक्ष)
-
सावंतवाडी-33
विजयी – विद्याधर परब – 17 ( मविआ)
गुरुनाथ पेडणेकर – 16 (भाजपा)
-
कणकवली-37
विठ्ठल देसाई – विजयी
सतीश सावंत – पराभूत
-
वेंगुर्ले-23
विजयी – मनिष दळवी – 13 (भाजपा)
विलास गावडे – 8 (म वि आ)
-
मालवण-30
विजयी – व्हिक्टर डाॅन्टस – 19 (मविआ)
कमलाकंत कुबल – 11 (भाजपा)
-
देवगड-37
विजयी – प्रकाश बोडस – 19 (भाजपा)
अविनाश माणगावकर – 17 (मविआ)
-
वैभववाडी-20
विजयी – दिलीप रावराणे – 11 (भाजपा)
दिगंबर पाटील – 9 (मविआ)
-
दोडामार्ग-12
विजयी – गणपत देसाई – 7 (मविआ)
प्रकाश गवस – 5 (भाजप)
शिवसेनेचे सतीश सावंत यांना जोरदार धक्का
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने पुन्हा एकदा सत्ता काबीज केली आहे. भाजपचे 11 उमेदवार निवडून आले तर महाविकास आघाडीचे 8 उमेदवार निवडून आलेले आहेत. त्यामुळे हा महाविकास आघाडीला धक्का मानला जातो आहे.
गेल्या दोन-तीन दिवसापासून भाजप नारायण राणे आणि शिवसेना हल्ला प्रकरणासंदर्भात संघर्ष सुरू झाला होता. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे हे संशयित आरोपी आहे. याच प्रकरणात नितेश राणेंना अटकपूर्व जामीन सुद्धा कोर्टाने फेटाळला आहे. असं असताना जिल्हा बँकेतील हा विजय राणेंसाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जात आहे.
पाहा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा संपूर्ण निकाल
भाजप वि. महाविकास आघाडी
-
राजन कृष्णा तेली 63 विरुद्ध सुशांत श्रीधर नाईक 78 (विजयी)
-
अतुल सुधाकर काळसेकर 44 (विजयी) विरुद्ध सुरेश यशवंत दळवी 26
-
गजानन सुमंत गावडे 110 (विजयी) विरुद्ध लक्ष्मण आनंद आंगणे 85
-
महेश रमेश सारंग 33 (विजयी) विरुद्ध मधुसुदन केशव गावडे 27
-
संदिप उर्फ बाबा मधुकर परब 68 (विजयी ) विरुद्ध विनोद रामचंद्र मर्गज 54
-
समीर रमाकांत सावंत 110 (विजयी ) विरुद्ध विकास भालचंद्र सावंत 85
-
मनीष प्रकाश दळवी 13 (विजयी ) विरुद्ध विलास प्रभाकर गावडे 8
-
गुरूनाथ शंकर पेडणेकर 16 विरुद्ध विद्याधर रविंद्रनाथ परब 17 (विजयी)
-
प्रकाश सखाराम गवस 5 विरुद्ध गणपत दत्ताराम देसाई 7 (विजयी)
-
विठ्ठल दत्ताराम देसाई (विजयी) विरुद्ध सतीश जगन्नाथ सावंत
-
प्रकाश जगन्नाथ मोर्ये 15 विरुद्ध विद्याप्रसाद दयानंद बांदेकर 20 (विजयी)
-
प्रकाश विष्णू बोडस 19 (विजयी) विरुद्ध अविनाश मनोहर माणगांवकर 17
-
कमलाकांत उर्फ बाळू धर्माजी कुबल 11 विरुद्ध व्हिक्टर फ्रान्सिस डान्टस 19 (विजयी)
-
दिलीप मोहन रावराणे 11 (विजयी) विरुद्ध दिगंबर श्रीधर पाटील 9
-
अस्मिता दत्तात्रय बांदेकर 459 (विजयी) विरुद्ध अनारोजीन जॉन लोबो 457
-
प्रज्ञा प्रदिप ठवण 480 विरुद्ध निता रणजितसिंग राणे 503 (विजयी)
-
सुरेश ज्ञानदेव चौकेकर 458 विरुद्ध आत्माराम सोमा ओटवणेकर 506 (विजयी)
-
रविंद्र मनोहर मडगांवकर 484 ( विजयी ) विरुद्ध मनिष मधुकर पारकर 481
-
गुलाबराव शांताराम चव्हाण 451 विरुद्ध मेघनाद गणपत धुरी 517 (विजयी)
पराभूत उमेदवार महाविकास आघाडी
-
सतीश सावंत
-
सुरेश दळवी
-
एम के गावडे
-
विकास सावंत
-
अविनाश माणगाकर
-
दिगंबर पाटील
-
विनोद मर्गज
-
विलास गावडे
-
अनारोजीन लोबो
-
मनीष पारकर
-
लक्ष्मण (बाबा आंगणे)
भाजपचे पराभूत उमेदवार
-
राजन तेली
-
प्रकाश गवस
-
प्रकाश मोर्ये
-
गुरुनाथ पेडणेकर
-
गुलाबराव चव्हाण
-
सुरेश चौकेकर
-
अस्मिता बांदेकर
-
कमलकांत कुबल
ADVERTISEMENT