देशाच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्युमोनिया अशा दोन आजारांची लागण झाल्याने त्यांना मुंबईतील ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 8 जानेवारीला त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांना कोरोनाची लक्षणं जाणवू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
ADVERTISEMENT
डॉ. प्रतीत समदानी यांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर या अजूनही आयसीयूमध्येच आहेत. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहेत. लता मंगेशकर यांच्या कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत मात्र त्यांचं वय 92 वर्षांचं आहे त्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
लता मंगेशकर यांच्या प्रकृतीची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चौकशी केली. तसंच गरज पडल्यास मीदेखील रूग्णलयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करेन असंही किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लता मंगेशकर यांना ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना कोरोनासोबतच निमोनियानेही ग्रासलं आहे.
2019 मध्ये 28 दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी
2019 मध्येही लतादीदींना न्युमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल 28 दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीच्या शनिवारी रूग्णालयात अॅडमिट करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. डॉ. प्रतीत समदानी हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. लता मंगेशकर या आम्हा डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.
ADVERTISEMENT