महाराष्ट्रातल्या दोन मुलांनी त्यांच्या आईचं लग्न मोठ्या थाटामाटात लावून दिलं आहे. डिसेंबर 2021 मध्ये एका मुलीने तिच्या आईच्या मेहंदीचा फोटो शेअर केला. त्यावेळी तिने हेपण सांगितलं होतं की 15 वर्षे सिंगल मदर असलेली माझी आई लग्न करते आहे. नेटकऱ्यांना आणि इतर सगळ्यांनाच या दोन मुलांची खरीखुरी गोष्ट आवडली.
ADVERTISEMENT
Humans Of Bombay ने ही स्टोरी इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शेअर केली आहे. या महिलेचं नाव सोनी सोमानी आहे. त्यांची मुलगी श्रेयाने सांगितलं की, ‘सोनी या जेव्हा 17 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं लग्न झालं. त्यावेळी त्यांचं शिक्षणही पूर्ण झालं नव्हतं. त्यानंतर 18 व्या वर्षी माझा (श्रेया) जन्म झाला. त्यानंतर काही वर्षांनी माझा भाऊ समीरचा जन्म झाला. माझे वडील आईला मारहाण करत असत. ती गरोदर असतानाही तिने मार खाल्ला आहे. माझी आई माहेरी गेली तिने तिच्या आई वडिलांनाही सगळं सांगितलं मात्र त्यांनी तिची मदत केली नाही. उलट नवऱ्याला अॅडजेस्ट कर असा सल्ला दिला.’
श्रेया पुढे सांगते की मी लहान होते तेव्हापासूनच मी वडिलांना माझ्या आईला शिवीगाळ करताना आणि मारहाण करताना पाहिलं. अनेकदा तर आम्ही शाळेतही जात नव्हतो कारण आम्हाला भीती वाटायची की आम्ही शाळेत गेलो तर आमचे वडील आईला मारून टाकतील. आम्ही आमच्या आईला वडिलांपासून वाचवण्याचा प्रयत्न केला होता मात्र तेव्हा आम्हालाही मार खावा लागला होता.
आमच्या या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट आला तो मला आणि माझ्या बावाला शाळेने बोलावून घेतलं. तुम्ही दोघेही दोन महिन्यांपासून शाळेत का येत नाही? अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी आमची आई सोनी यांना हे वाटलं की आता प्रश्न मुलांच्या भवितव्याचा आहे. त्यामुळे आईने आम्हाला सोबत घेतलं आणि वडिलांना घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. वडिलांसोबत घटस्फोट झाल्यानंतर माझी आई कॉल सेंटरमध्ये काम करू लागली. नोकरीसोबतची आई शिक्षणही घेत होती.
मी जेव्हा बारावीत होते तेव्हा माझ्या आईने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यानंतर आई MBA झाली. त्यानंतर आईला प्रॉडक्ट मॅनेजरची नोकरी मिळाली आणि आमचं आयुष्य पूर्वीपेक्षा खूपच सुखकर झालं. याच दरम्यान आईच्या आयुष्यात एका खास व्यक्तीची एंट्री झाली. दोघांनी आधी एकमेकांना डेट केलं. त्यानंतर आई सोनीने मुलांना आपण प्रेमात पडल्याचं सांगितलं. ही गोष्ट ऐकून मुलं खुश झाली त्यांनी मोठ्या आनंदाने थाटात आपल्या आईचं लग्न लावून दिलं. डिसेंबर 2021 मध्ये हे लग्न पार पडलं आहे. आता आमचं एकत्र कुटुंब आहे आणि आम्ही मोठ्या आनंदात राहात आहोत असंही श्रेया आणि सोनी यांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT