नजर हटी…: मोबाईवर बोलणाऱ्या ड्रायव्हरने ब्रेक दाबून मृत्यूलाच दिलं निमंत्रण; 6 जणांचे गेले प्राण

मुंबई तक

• 02:21 AM • 17 Nov 2021

-विजयकुमार बाबर, प्रतिनिधी अनेकदा मोबाईलमुळे आजूबाजूला कोण आहे, याचंही भान अनेकांना राहत नाही. अगदी व्यसनप्रमाणे अनेकजण मोबाईलमध्ये गुंग असतात. पण याच मोबाईल वेडामुळे सहा जणांचे प्राण गेल्याचं समोर आलं आहे. सोलापूर-अक्कलकोट मार्गावर झालेला जीपचा अपघात टायर फुटून नव्हे, तर मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाने अचानक खड्डा आल्यानंतर ब्रेक लावल्याने झाल्याचं समोर आलं आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने हा […]

Mumbaitak
follow google news

-विजयकुमार बाबर, प्रतिनिधी

हे वाचलं का?

अनेकदा मोबाईलमुळे आजूबाजूला कोण आहे, याचंही भान अनेकांना राहत नाही. अगदी व्यसनप्रमाणे अनेकजण मोबाईलमध्ये गुंग असतात. पण याच मोबाईल वेडामुळे सहा जणांचे प्राण गेल्याचं समोर आलं आहे. सोलापूर-अक्कलकोट मार्गावर झालेला जीपचा अपघात टायर फुटून नव्हे, तर मोबाईलवर बोलणाऱ्या चालकाने अचानक खड्डा आल्यानंतर ब्रेक लावल्याने झाल्याचं समोर आलं आहे. एका प्रत्यक्षदर्शी प्रवाशांने हा दावा केला आहे.

सोलापूर जिल्ह्यात अनेक महिन्यांनंतर एक भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी सगळ्याच रस्त्यांचं चौपदरीकरण झालं आहे त्यामुळे अपघातांचं प्रमाण कमी झालं आहे. अशात मंगळवारचा दिवस अक्कलकोटहून सोलापूरला येणाऱ्या प्रवाशांसाठी घातवार ठरला. जीपचा चालक मोबाईलवर बोलत होता त्यामुळे हा अपघात झाला, असा आरोप एका प्रवाशाने केला आहे.

प्रवासी जीपमधून प्रवास करणारे तब्बल पाच जण जागीच ठार झाले तर उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झालाय.सहा जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून आद्यप एक प्रवाशी गंभीर जखमी आहे.

दरम्यान प्रवासी जीपचा पुढचा टायर फुटून जीप उलटली आणि हा अपघात झाला अशी माहिती प्राथमिकदृष्ट्या समोर आली. मात्र हा अपघात टायर फुटल्याने झालाच नाही हा अपघात तर जीपचा चालक वारंवार फोनवर बोलत होता त्याचे लक्ष विचलित होते. समोर खड्डा आला आणि अचानक जोरात ब्रेक त्यांनी दाबला त्यामुळे वेगात असलेली गाडी दोनदा उलटली. अनेक प्रवासी बाहेर फेकले गेले. काही प्रवासी आतमध्ये दाबून गेले. त्यामुळे सहा जणांवर काळाने घाला घातला. जीप चालक ड्रायव्हर च्या मोबाईलवर बोलण्याच्या सवयीमुळे हा अपघात झाल्याचे अक्कलकोटहून पुण्याला जाणाऱ्या एका वृद्ध प्रवाशाने सांगितलं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप असल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे.प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात कोंबली जात आहेत. त्याचाच परिणाम सोलापूर अक्कलकोट रोडवर मोठा अपघात झाला आणि जागीच पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर उपचारा दरम्यान आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

मृत प्रवासी

कट्ट्यावा यल्लप्पा बनसोडे (वय 55 , अक्कलकोट)

बसवराज यल्लप्पा बनसोडे (वय 42, अक्कलकोट)

आनंद इर्राप्पा गायकवाड (वय 25 रा. ब्यागेहाळी, ता.अक्कलकोट)

लक्ष्मण मुरलीधर शिंदे (वय 42, बनजगोळ ता. अक्कलकोट)

आनंद युवराज लोणारी (वय 28, अक्कलकोट)

एक अनोळखी महिला अंदाजे वय 35 या पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय तर उपचारादरम्यान युवा शिक्षक आनंद लोणारी चा मृत्यू झालाय.

थरकाप उडवणारा अपघात! सोलापूरमध्ये भरधाव जीपचे टायर फुटले; पाच प्रवाशी जागीच ठार

उपचारादरम्यान आनंद युवराज लोणारी (वय 28, राहणार अक्कलकोट शहर) असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. आनंद हा अक्कलकोटमधील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षक होता. मयत आनंद लोणारी यांचा अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याची माहिती मिळाली. लोणारी हे आमदार कल्याणशेट्टी यांच्या मुलांना घरी येऊन ट्युशन देत होते. मंगळवारी एसटी नसल्याने लोणारी हे सुद्धा प्रवासी जीपने सोलापूरकडे येत होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने सिव्हिल हॉस्पिटलमधून त्यांना अश्विनी रुग्णालयात हलवण्यात आले होते, मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    follow whatsapp