पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा! भाजप कार्यकर्त्यांवर राष्ट्रवादीने केला मारहाणीचा आरोप

मुंबई तक

16 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:56 AM)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smrti Irani) यांच्या हस्ते अमित शाह (Amit Shah) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलं. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप असा मोठा राडा पाहण्यास मिळाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काहीवेळ थांबवावा लागला. या घटनेनंतर त्या ठिकाणी […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smrti Irani) यांच्या हस्ते अमित शाह (Amit Shah) यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडलं. याच कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध भाजप असा मोठा राडा पाहण्यास मिळाला. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काहीवेळ थांबवावा लागला.

हे वाचलं का?

या घटनेनंतर त्या ठिकाणी पोलीस आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. असं असलं तरीही भाजपच्या महिला आणि पुरूष कार्यकर्त्यांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप महिला कार्यकर्त्यांनी केला आहे.

NCP च्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं हे ट्विट

महिलांचा सन्मान करणे ही @BJP4Maharashtra ची परंपरा नाही याचे ज्वलंत उदाहरण पुण्यात स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमात पहायला मिळाले. भाजपच्या पुरुष कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांवर हात उचलून लज्जास्पद भाजप संस्कृतीचे दर्शन घडवले. असं म्हणत भाजपच्या निषेधाचं ट्विट करण्यात आलं आहे.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन स्मृती इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. आज सकाळपासूनच इराणी यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेच्या नेत्यांनी आणि महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. स्मृती इराणी ज्या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या तिथेही त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांन या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर बालगंधर्व रंगमंदिरात ही घटना घडली.

भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपवर कडाडून टीका केली जाते आहे. एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात आपला निषेधही नोंदवला.

नेमकं काय घडलं?

स्मृती इराणी या जेव्हा विरोधात होत्या तेव्हा त्यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांचे दर वाढल्याने दिल्लीत आंदोलन केलं होतं. २०१२ मध्ये झालेलं हे आंदोलन चांगलंच चर्चेत राहिलं. आज पुण्यात जेव्हा स्मृती इराणी आल्या तेव्हा त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आंदोलन केलं. कारण आत्ताही इंधनाचे जर म्हणजेच पेट्रोल, डिझेल आणि सिलिंडरचे दर वाढले आहेत. मात्र त्याबाबत स्मृती इराणी काहीही का बोलत नाहीत? असा प्रश्न त्यांनी विचारला.

स्मृती इराणी कार्यक्रमात आल्या तेव्हाही राडा झाला. घोषणाबाजीही सुरू झाली. पोलिसांना हस्तक्षेप करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढावं लागलं. पोलीस जेव्हा महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढत होते तेव्हा भाजपच्या पुरूष आणि महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली असाही आरोप राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी केला आहे. आता या प्रकरणी नेमकं काय होणार? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हीडिओ

    follow whatsapp