Solapur Crime: पतीने पत्नीचा डावा कानच कापून टाकला, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

27 Feb 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:40 PM)

Husband cutting off his wife’s ear: सोलापूर: सोलापुरातील (Solapur) नवीन विडी घरकुल परिसरात एका महिलेला पतीने मारहाण करत तिचा कानच कापून टाकल्याची अतिशय विचित्र अशी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. (husband cuts off his wifes ear […]

Mumbaitak
follow google news

Husband cutting off his wife’s ear: सोलापूर: सोलापुरातील (Solapur) नवीन विडी घरकुल परिसरात एका महिलेला पतीने मारहाण करत तिचा कानच कापून टाकल्याची अतिशय विचित्र अशी घटना घडली आहे. ही घटना शनिवारी घडल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पीडित महिलेच्या आई आणि इतर नातेवाईकांनी तिला ताबडतोब शासकीय रुग्णालयात दाखल केले. (husband cuts off his wifes ear in solapur due to suspicion of character)

हे वाचलं का?

डॉक्टरांनी तातडीने उपचार करत तिच्या कानावर शस्त्रक्रिया केली आणि 30 टाके घालून तिचा कापलेला कान यशस्वीपणे जोडला. आरिफा अकिल सय्यद अस पीडित महिलेचे नाव आहे. या महिलेचा पती अकिल शकील सय्यद हा सध्या फरार असल्याचं समजतं आहे. पीडित महिला आरिफा सय्यद ही रुग्णालयात उपचार घेऊन वळसंग पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली आहे.

पीडित महिला आरिफा सय्यद ही विधवा होती. 2015 पासून ती अकिल सय्यदच्या संपर्कात आली. अकिल हा रिक्षा चालक आहे. अकिल हा देखील विवाहित होता. पहिली पत्नी असतानाही त्याने आरिफा सोबत 2019 मध्ये लग्न (निकाह) केलं होतं.

पतीकडून पत्नीच्या प्रियकराला गुप्तांगावर ‘ओलिनी स्प्रे’ मारत जबर मारहाण, अनैतिक संबंध असल्याचा संशय

अकिल सय्यदला पहिल्या पत्नीपासून एक मुलगा आहे. लग्नापूर्वी आरिफा ही विधवा असताना अकिलने तिला चांगले नांदवण्याचे, आश्वासन दिले होते. पण विवाहानंतर तिच्या चारित्र्यावर संशय घेत घरगुती हिंसाचार सुरू केला. हा वाद दररोज होऊ लागला होता. तसंच अकील हा आरिफाला वारंवार मारहाण देखील करत होता.

धक्कादायक.. पुण्यात पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा काढला काटा

दरम्यान, शनिवारी देखील अकिल आणि आरिफामध्ये प्रचंड वाद झाला. ज्यावेळी प्रचंड संतापलेल्या अकिल थेट चाकू घेऊन आरिफाचा डावा कानच कापून टाकला. अचानक झालेल्या या हल्ल्याने ती प्रचंड घाबरली आणि आरडाओरडा सुरू केलं. यावेळी शेजारांनी घराकडे धाव घेत अकिलच्या तावडीतून सोडवलं. यावेळी हा सगळा प्रकार काही जणांनी मोबाइलमध्ये शूट केला असून त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.

याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली असून सोलापूर पोलीस सध्या फरार आरोपी अकिलचा शोध घेत आहेत.

    follow whatsapp