सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कासारवाडी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मटण खायला घालत नाही म्हणून रागावलेल्या मुलाने कुऱ्हाडीचे वार करत आपल्याच वडिलांची हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
कासारवाडी गावाच्या हद्दीत भंडारदरा मळवी शिवारात पांडुरंग सस्ते हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. 29 एप्रिल रोजी संध्याकाळी पावणे पाच वाजल्याच्या दरम्यान, पांडुरंग यांचा मुलगा नटराजने तुम्ही मटण खायला का घालत नाही म्हणून वाद घालायला सुरुवात केली.
हा वाद सुरु असतानाच अवघ्या काही क्षणात नटराजने कुऱ्हाड हातात घेऊन वडिलांच्या मानेवर आणि डोक्यात कुऱ्हाडीने वार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलगा नटराजला अटक केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
तुझ्या पॉर्न व्हिडीओतून पैसे कमावेन ! नातेवाईकांकडून पत्नीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल
ADVERTISEMENT