देशावर कोरोनाचं संकट आलं त्यावेळी अभिनेता सोनू सूद अगदी खऱ्या हिरोप्रमाणे धावून आला. सोनूने या संकटकाळात अनेक लोकांना मदतीचे हात दिले. यानंतर सोनू सूदला पंतप्रधान करावं अशी मागणी केली जाऊ लागली. नुकतंच अभिनेत्री राखी सावंतने देखील सोनू सूदला पंतप्रधान करा अशी मागणी केली. दरम्यान यावर खुद्द सोनूनेच प्रतिक्रिया दिली आहे.
ADVERTISEMENT
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी अभिनेता सोनू सूदने सांगितला उपाय
सध्या सोनूचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय. या व्हीडिओमध्ये सोनू त्याच्या घऱाबाहेर असलेल्या पापाराझींना ज्यूसचं वाटप करतोय. अशातच एकाने सोनूला, तुम्हाला पंतप्रधान बनवण्याची मागणी केली जातेय याबाबत त्याचं मत विचारलं.
अभिनेते सोनू सूद किंवा सलमानला देशाचं पंतप्रधान बनवा; राखी सावंतची मागणी
केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे, तर अनेक सेलेब्रिटीजनही, सोनू पंतप्रधान व्हायला हवा, अशी इच्छा जाहीरपणे व्यक्त केली आहे. यामध्ये अभिनेत्री राखी सावंत तसंच अभिनेता वीर दास यांनी ही मागणी केली होती.
ADVERTISEMENT