साऊथ सुपरस्टार चिरंजिवी यांना यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आहे माझ्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी आणि योग्य ती काळजी घ्यावी अशी विनंतीही चिरंजिवी यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
काय आहे चिरंजिवी यांचं ट्विट?
मी कोरोना चाचणी केली असून ती पॉझिटिव्ह आली आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणं आढळली आहेत. त्यामुळे मी होम क्वारंटाईन झालो आहे. माझ्या संपर्कात जे कुणी आलं आहे त्यांनी त्यांची चाचणी करून घ्यावी. तसंच आरोग्याची काळजी घ्यावी असंही आवाहन चिरंजिवी यांनी केलं आहे.
बातमी समजल्यानंतर चिरंजीवीचे अनेक चाहते सोशल मीडियावर त्याच्यासाठी प्रार्थना करू लागले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीशी संबंधित सर्व मित्रही चिरंजीवीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतं आहेत. निर्माता श्रीनिवास कुमन यांनी चिरंजीवीसाठी लिहिले आहे की, ‘गेट वेल सून बॉस’, चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनीही चिरंजीवीसाठी म्हटले की ‘सर लवकर बरे व्हा.
कोरोनाचा संसर्ग इतका वाढला आहे की, काही कलाकारांनी आपले चित्रपट पुढे ढकलले आहेत. तसेच तयार असलेले चित्रपट रिलीज करण्यात आलेले नाहीत. कोरोनाची काळजी घेऊन सुध्दा अनेक कलाकारांना कोरोना झाल्याचे पाहावयास मिळत आहे. नुकतेच चिरंजीवी यांना कोरोना झाल्यानंतर त्यांनी सोबत असलेल्या सगळ्यांना चाचणी करून काळजी घ्या असं सांगितलं आहे.
देशभरात कोरोनाचं वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेकांनी काळजी घेऊनही कोरोनाने त्यांना गाठलं आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट देशभरात सुरू आहे. त्यामुळे अनेकांना कोरोना झाल्याचं पाहायला मिळतंय. कोरोनाच्या काळात अनेकांनी आपली साथ अर्धवट सोडली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे.
ADVERTISEMENT