नवज्योत सिंग सिध्दू यांनी मंगळवारी पंजाबच्या कॉग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सर्वाधिक चर्चेत आल्या त्या अभिनेत्री अर्चना पूरण सिंग.. त्यांच्या आणि सिध्दूवर सोशल मिडीयावर असंख्य मीम्सना सुरवात झाली. या मीम्सवर आजतक शी बोलताना अर्चना पूरण सिंग म्हणाल्या की मला हे सगळे मीम्स पाठवा मी त्या मीम्सना माझ्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करेन..
ADVERTISEMENT
अर्चना पूरण सिंग म्हणते की कोण म्हणतं की माझ्या खुर्चीला धोका आहे म्हणून.. उलट कपिल शर्मा शोे ची खुर्ची नवज्योत सिंग सिध्दूनेच सोडली आहे. उलट धोका सिध्दूना असला पाहिजे की जी खुर्ची त्यांनी सोडलीय त्यावर मी कब्जा करू शकते. अशीही मी खुर्चीवर कब्जा करण्यासाठी बदनाम आहे. सतत मला कपिल शर्मा शोमध्ये यावरून टोमणे एेकावे लागतात. उलट आता ज्यांनी खुर्ची सोडली आहे त्यांना धोका जास्त आहे कारण माझी नजर आता त्या खुर्चीवरही पडू शकते.
पुढे जाऊन त्या म्हणतात की मी या सगळ्या गोष्टींना फारच विनोदाने घेते आहे. मला नाही माहित की सिध्दूनी कोणत्या कारणासाठी पंजाब कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची सोडली आहे. मला राजकारणातलं झिरो कळतं. या त्यांच्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मात्र मला राजकारणातलं काही कळत नसल्याने मी यावर काही बोलू शकत नाही. मला तर इतकंच कळतं की मी गेली ४० वर्ष बॉलिवूडमध्ये काम करते आहे. मी जे काही मिळवलं आहे ते माझ्या मेहनतीवर मिळवलेलं आहे. त्यामुळे त्यांनी खुर्ची सोडली असली तरी माझ्या खुर्चीला काही धोका नाहीये हे नक्की आहे.
ADVERTISEMENT