वसईत सध्या बोगस डॉक्टरांच्या विरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. माजी वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर यांना पोलिसांनी अटक केल्याचं प्रकरण ताजं असतानाच स्वयंघोषित अस्थिरोग तज्ज्ञ हेमंत पाटील याला वसई पोलिसांनी अटक केली आहे. हेमंत पाटील हा बोगस डॉक्टर असून त्याने पाच लग्नं करून महिलांची फसवणूक केली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमंत पाटीलने गुजरात आणि बडोदा येथील MBBS आणि MS Ortho अशा दोन बनावट पदव्याही तयार केल्या होत्या. एका डॉक्टरच्या नोंदणी क्रमांकावर त्याने वसईच्या उच्चभ्रू विभागात दवाखानाही थाटला होता. पालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून याबाबत तक्रार दिल्यानंतर वसई पोलीस ठाण्यात त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील १३ दिवसांपासून हेमंत पाटील पोलिसांना गुंगारा देत होता अखेर सत्र न्यायालयात त्याचा जामीन नामंजूर झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ठाणे शहरातून अटक केली आहे…बुधवारी त्याला वसई सत्र न्यायालयात हजर केले असता १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तीन वर्षे सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर लग्नास नकार देणं ही फसवणूक नाही- बॉम्बे हायकोर्ट
काय आहे प्रकरण?
हेमंत पाटीलने सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असलेल्या महिलांना टार्गेट केले होते. हेमंत पाटीलला पॉर्नचे व्यसन आहे. त्याला मनोरुग्णालयात पाठवले पाहिजे असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. सोनवणे त्याच्या पहिल्या पत्नीला कटनी येथे भेटला होता. त्यांना 18 वर्षांचा एक मुलगाही आहे. या जोडप्याच्या घटस्फोटानंतर तो त्याच्या आईसोबत राहतो. हेमंत पाटील पहिली पत्नी सरकारी कार्यालयात इंजिनियर म्हणून कार्यरत होती.
2014 मध्ये हेमंत पाटीलशी लग्न करणाऱ्या एका डेंटिस्ट महिलेने सांगितलं की ‘त्याच्याशी एका मॅट्रिमोनियल वेबसाइटद्वारे माझी भेट झाली. तो ऑर्थोपेडिक सर्जन असल्याचे भासवत असे. एकदा तो माझ्या भावाला मुलुंडच्या एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला, जिथे तो सल्लागार होता’ लग्नानंतर एका आठवड्यातच तिला कळले की त्याची शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय पदवी बनावट आहेत. तिने अमरावती येथे पोलिसात फिर्याद दिली.
ठाणे : पॅरिसमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल असल्याचं सांगून 26 महिलांची फसवणूक; अनेकींवर बलात्कार
सप्टेंबर 2015 मध्ये, त्याला अटक करण्यात आली आणि सुमारे नऊ महिने त्याला तुरुंगात टाकण्यात आले,” असेही डेंटिस्ट महिलेने सांगितले. काही दिवसातच तिने हेमंतला घटस्फोट दिला. हेमंत पाटीलने मुंबईत काही शस्त्रक्रिया केल्या, त्या सर्व शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्या, असाही दावा तिने केला.
हेमंत पाटीलने कर्नाटकातील हुबळी येथील गणिताच्या प्राध्यापक महिलेशी लग्न केले. ‘माझ्या भावंडांमध्ये मी सर्वात मोठी आहे. मी ऑगस्ट 2016 मध्ये माझे वडील गमावले, आणि मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी पेलू शकणार्या एका जबाबदार व्यक्तीच्या शोधात होते, कारण माझी भावंडे अजूनही शिकत होती असं तिने सांगितलं. हेमंत पाटीलने तिला आवश्यक असलेला पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली आणि ते हुबळीला गेले. त्याने मला सांगितले होते की तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो, पण नंतर तो मला हॉटेलची बिलं भरायला लावायचा. नंतर त्याने माझे दागिने विकले. हळूहळू, माझ्या कुटुंबाला संशय आला आणि मी त्याला सोडले. मी आता भावनिकदृष्ट्या खचले आहे असंही या महिलेने सांगितलं आहे. या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट मिड-डेने दिला आहे.
ADVERTISEMENT