रशियाची Sputnik V ही लस मे महिन्यात भारतात मिळू शकणार

मुंबई तक

• 07:01 AM • 28 Apr 2021

रशियाची Sputnik V ही लस मे महिन्यापासून भारतात मिळू शकणार आहे. डॉ. रेड्डीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. दीपक सप्रा हे डॉ. रेड्डी लॅबरोटरीजचे सीईओ आहेत. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली की रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची पहिली बॅच मे महिन्यात भारतात येईल आणि त्यामुळे मे महिन्यात […]

Mumbaitak
follow google news

रशियाची Sputnik V ही लस मे महिन्यापासून भारतात मिळू शकणार आहे. डॉ. रेड्डीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इंडिया टुडेशी बोलताना ही माहिती दिली आहे. दीपक सप्रा हे डॉ. रेड्डी लॅबरोटरीजचे सीईओ आहेत. त्यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ही बाब स्पष्ट केली की रशियाच्या स्पुटनिक व्ही या लसीची पहिली बॅच मे महिन्यात भारतात येईल आणि त्यामुळे मे महिन्यात ही लस भारतात मिळू शकणार आहे. तूर्तास प्राथमिक पातळीवर स्पुटनिक व्ही ही लस मर्यादित स्वरूपात येणार आहे. त्यानंतर पुरवठा वाढवण्यात येईल असंही सप्रा यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

1 मे नंतर महाराष्ट्रातल्या 18 वर्षावरील सर्वांना लसीकरण शक्य आहे का ?

आणखी काय म्हटलं आहे सप्रा यांनी?

भारतात एकूण सहा टप्प्यात ही लस आणली जाणार आहे. त्यातला पहिला टप्पा मे महिन्यात दाखल होईल. मे ते ऑगस्ट या कालावधीत ही लस आणली जाईल. त्यानंतर भारतात तयार करण्यात आलेली लस भारतीयांना सप्टेंबर महिन्यापासून मिळू शकणार आहे. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भारतात तयार करण्यात आलेली स्पुटनिक व्ही लस भारतीयांना उपलब्ध होईल.

Sputnik V लस 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी?

डॉ. रेड्डीज या प्रयोगशाळेने एप्रिलच्या आठवड्यात भारतात या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे संमती मागितली होती. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (RDIF) ने डॉ. रेड्डीसोबत सप्टेंबर 2020 मध्ये भारतात Sputnik V लसीची चाचणी केली होती. Sputnik V च्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार ही लस 91 टक्के प्रभावी आहे.

मुंबईत Corona ची दुसरी लाट ओसरायला सुरूवात झाली आहे का? डॉ. शशांक जोशी म्हणतात..

2021 या संपूर्ण वर्षात Sputnik V या लसीचे 12 ते 13 कोटी लोकांना लस देण्याची आमची तयारी आहे. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनेनुसार पहिल्या टप्प्यातील लसी आयात केल्या जातील या लसी उपलब्ध झाल्यानंतर जेव्हा भारतात निर्मिती सुरू होईल तेव्हा आम्ही त्या केंद्र सरकार, राज्य सरकारं आणि खासगी रूग्णालयांना देणार आहोत असंही सप्रा यांनी सांगितलं.

या लसीची किंमत भारतात काय असेल हे आम्ही विचारलं तेव्हा दीपक सप्रा म्हणाले की ‘रशियाकडून आयात होणाऱ्या लसीच्या किंमतीत आणि भारतात तयार होणाऱ्या लसींच्या किंमतीत फरक असेल. आम्ही त्यावर विचार करतो आहोत. स्पुटनिक व्ही ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचंही सप्रा यांनी स्पष्ट केलं. ‘

    follow whatsapp