– विजयकुमार बाबर, सोलापूर प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्यात एसटी कामगारांच्या संपाचा प्रश्न अजुनही सुरुच आहे. आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहिल अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान आज सोलापुरातील कुर्डुवाडी आगारातील कर्मचाऱ्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. आमच्या पगारात संजय राऊतांनी घर चालवून दाखवावं असं आव्हान या कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी आहे त्या पगारावर काम करावं असं वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. या वक्तव्याचा समाचार आंदोलनकर्त्या कामगारांनी घेतला.
कुर्डूवाडी आगारात कार्यरत असलेले जवळपास ३०० कर्मचारी संपात सक्रिय झाले असुन आगाराच्या प्रवेश द्वारावरच ते ठाण मांडून बसलेले आहेत.राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्यानी राज्यभरात संपाचे हत्यार उपसलेले आहे.कुर्डूवाडी आगारात देखील कडकडीत संप अद्याप सुरू आहे.
महाविकास आघाडीचे सुत्र जुळवण्यासाठी खा.संजय राऊतांनी जसी धावपळ करुन मुख्यमंत्रीपदी उध्दव ठाकरेंना बसवले. तशीच धडपड आमच्या मागण्यांप्रती दाखवुन पुढाकार घेत आमचाही प्रश्न मार्गी लावावा. राऊतांना कर्मचाऱ्यांच्या मागण्याप्रश्नी बोलता येत नसेल तर किमान आत्महत्या वाढवण्याचं काम करू नये. बोलताना त्यांनी जिभेवर जरा ताबा ठेवावा. एसटी कर्मचाऱ्याचा पगार घेऊन त्यांनी त्या पगारात त्याचं घर चालवुन दाखवावे, असे आव्हान देखील एसटी कर्मचाऱ्याने खा.राऊत यांना केले आहे.
त्यामुळे एसटी संपाच्या पेचावर आता सरकार कधी तोडगा काढलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT