एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात फूट! अजय गुजर प्रणित संघटनेची संप मागे घेतल्याची घोषणा

मुंबई तक

• 04:06 PM • 20 Dec 2021

ST कर्मचाऱ्यांच्या संपात उभी फूट पडली आहे. कारण अजय गुजर प्रणित संघटनेने एसटीच्या संपातून माघार घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि अजय गुजर यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून एक संघटना बाहेर पडल्याने संपाची उभी फूट पडली आहे. एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार, […]

Mumbaitak
follow google news

ST कर्मचाऱ्यांच्या संपात उभी फूट पडली आहे. कारण अजय गुजर प्रणित संघटनेने एसटीच्या संपातून माघार घेतली आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि अजय गुजर यांच्यात चर्चा झाली. त्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपातून एक संघटना बाहेर पडल्याने संपाची उभी फूट पडली आहे.

हे वाचलं का?

एसटी कर्मचारी संप बेकायदेशीर, अवमान याचिका दाखल करणार, परबांची माहिती

काय म्हणाले अजय गुजर?

आम्ही संप पुकारला होता. तो आज झालेल्या बैठकीनंतर आम्ही मागे घेत आहोत. एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की, सर्व कर्मचाऱ्यांनी आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. 22 डिसेंबरपर्यंत तुम्ही कामावर हजर व्हा. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती आम्ही केली आहे. असं अजय गुजर यांनी सांगितलं.

आझाद मैदान आणि राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याबाबत विचारलं असता, कर्मचारी भावनाविवश होत आहेत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाहीत, पैसे कुणी जमा केले हे आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात कोणतीही फूट पडलेली नाही, असं अजय गुजर यांनी सांगितलं. तसंच आता चर्चा करायची नाही. आम्ही संप पुकारला होता तो आम्ही मागे घेतला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

    follow whatsapp