RFO दीपाली चव्हाणांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार: नवनीत राणा

मुंबई तक

• 11:32 AM • 26 Mar 2021

अमरावती: मेळघाटमधील वनविभागाच्या अधिकारी RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला राज्यसरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर (302) खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागण देखील केली आहे. या संपूर्ण घटनेबद्दल नवनीत राणा […]

Mumbaitak
follow google news

अमरावती: मेळघाटमधील वनविभागाच्या अधिकारी RFO दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्यानंतर आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. दीपाली चव्हाण यांच्या मृत्यूला राज्यसरकार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप देखील नवनीत राणा यांनी केला आहे. यावेळी त्यांनी DFO विनोद शिवकुमार यांच्यावर (302) खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागण देखील केली आहे.

हे वाचलं का?

या संपूर्ण घटनेबद्दल नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच याप्रकरणी मुख्य वनरक्षक श्रीनिवास रेड्डी यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नवनीत राणा यांनी एक पत्रक काढून याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

वन अधिकारी ते लेडी सिंघम… जाणून घ्या दीपाली चव्हाण यांच्याविषयी

पाहा नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात नेमकं काय म्हटलं:

‘सरकारच्या उदासीनतमुळे दीपाली चव्हाणांनी आपले प्राण गमावले’

दीपाली चव्हाण या अधिकारी महिला या अत्यंत कर्तव्यनिष्ठ होत्या. त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे कार्य त्यांचे वरिष्ठ अधिकारी करीत होते. सदर महिला अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आपली आपबिती व व्यथा मला काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेटून सांगितली होती. तेव्हा मी तात्काळ गांभीर्याने दखल घेऊन श्री. रेड्डी यांना सदर प्रकरणात जातीने लक्ष घालून या महिलेला न्याय मिळवून देण्याचे व डीएफओ शिवकुमार यांच्यावर उचित कडक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते.

बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्याशी या विषयावर 3 वेळा चर्चा देखील केली होती. तसेच पत्रव्यवहार सुद्धा केला होता. या महिलेची इतरत्र बदली करुन तिला वरिष्ठांच्या जाचातून मुक्त करावे अशी सुद्धा मी व आमदार रवी राणा यांनी शासन दरबारी मागणी केली होती.

‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत

परंतु वरिष्ठ पातळीवर कुणीही दखल न घेतल्यामुळे व राज्य सरकारच्या उदासीन वृत्तीमुळे, हलगर्जीपणामुळे दीपाली चव्हाण या न्यायापासून वंचित राहिल्या व आज त्यांना आपले प्राण गमवावे लागले. याला सर्वस्वी राज्यशासन जबाबदार आहे व हे राज्य सरकारचे अपयश आहे.

कर्तव्यात कुठलीही कसून करणाऱ्या एका महिलेला कर्तव्य बजावत असताना वरिष्ठांकडून अशा प्रकारे मानसिक त्रास देणे, तिचा छळ करणे आदी बाबींमुळे त्या महिलेचे मनोबल खचले व नैराश्य येऊन दीपाली चव्हाण यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी दीपाली चव्हाणांनी लिहलेल्या पत्रात नेमकं काय लिहलं होतं?, पाहा ‘ते’ पत्र

सदर घटना अत्यंत क्लेशदायक असून या घटनेस जबाबदार असणाऱ्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून त्यांना कठोर शासन व्हावे अशी मागणी आम्ही या निवेदनाद्वारे आपणांस करीत आहोत.

Dipali Chavan: महिला अधिकारी दीपाली चव्हाणांची गोळी झाडून आत्महत्या

कृपया या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी अटक केलेले शिवकुमार यांच्यावर 302 कलम लावून त्यांना कठोर शासन होईल अशी कार्यवाही करावी व शिवकुमार यांना पाठीशी घालणारे श्री. रेड्डी यांच्यावर सुद्धा कडक कार्यवाही करावी.

    follow whatsapp