नितीन शिंदे
ADVERTISEMENT
पंढरपूर: उजनी धरणातील (Ujani dam) पाण्यावरून सोलापूर-इंदापूर (Solapur-Indapur) संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. काल दिलेल्या इशाऱ्यावरनुसार उजनी संघर्ष समितीच्या वतीने आज पंढरपूर (Pandharpur) तालुक्यातील उपरी येथे सातारा रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
उजनी धरणातून इंदापूरसाठी 5 टीएमसी पाणी देण्याचा निर्णय जलसंपदामंत्र्यांनी रद्द झाल्याचे सांगितल्यानंतरही उजनी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात आली आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री सही करून हा आदेश रद्द करत नाही तोपर्यंत जिल्हाभर आंदोलने सुरू ठेवणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.
संघर्ष समितीने इशारा दिल्याप्रमाणे आंदोलनाची पहिली ठिणगी पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावात पडली. उजनी पाणी बचाव संघर्ष समितीने दिलेल्या इशाऱ्यानुसार पंढरपूर सातारा रस्त्यावरील उपरी येथे टायर जाळून महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. या प्रसंगी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे, सचिव माऊली हळलवर, दिपक वाडदेकर आदी उपस्थित होते.
उजनीच्या पाण्यावरुन संघर्ष कायम, इंदापुरात आंदोलनाला सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने दिला राजीनाम्याचा इशारा
दरम्यान, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार (NCP MLA) बबनराव शिंदे यांनी उजनीचे पाणी इंदापूरला न देण्याबाबत घेतलेल्या भूमिकेचा लेखी आदेश काढला नाही तर आपण आमदारकीचा राजीनामा (Resignation) देऊ अशी भूमिका काही दिवसांपूर्वीच जाहीर केली आहे.
‘विरोधकांनी आदेशाचे राजकारण करू नये. पक्षाध्यक्षांवर आमचा विश्वास आहे. उजनीच्या पाणी वाटपात पाणी शिल्लक नाही. इंदापूरला जे पाणी न्यायचं आहे ते खडकवासलावरून न्यावं. आमची काय हरकत नाही. मात्र, ऑक्टोबर ते जूनपर्यंत पुण्याहून उजनीमध्ये एक थेंबही पाणी येत नाही. अश्यात उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलणे हे सोलापूर जिल्ह्यावर अन्याय करणारे आहे. हा रद्द केलेला आदेश लवकरच लेखी स्वरुपात मिळेल आणि हे नाही झालं तर आमदारकीचा राजीनामा देईल.’ अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांनी घेतली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ आमदाराने का दिला राजीनामा देण्याचा इशारा, काय आहे नेमकं प्रकरण?
उजनीचे 5 टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याचे नेमकं प्रकरण काय आहे?
उजनी जलाशयाच्या ऊर्ध्व बाजूस बिगरसिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनीतून उचलून शेटफळगढे या नव्या प्रकल्पात टाकण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी घेतला होता.
इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला होता. तो निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज केली. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी व अन्य बाबींसाठी ठरलेल्या पाण्यातील एक थेंब जरी पाणी इंदापूरला नेला असेल तर मी राजकारण सोडून देईन. असे वारंवार पालकमंत्री तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.
उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका
मात्र, सांडपाणी धरणात आल्यानंतर धरणात कितीही पाणीसाठा असल्यास त्यातील पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांसाठी देण्याचा तो निर्णय होता. त्याला सोलापूर जिल्ह्यातून मोठा विरोध झाला. त्यासंदर्भात दोन-तीन वेळा बैठकाही झाल्या. त्या वेळी सर्वांनी हा आदेश रद्द करण्याचीच मागणी लावून धरली.त्यासाठी आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, उमेश पाटील, उत्तम जानकर, निरंजन भूमकर आदींनी जलसंपदा मंत्र्यांची मंगळवारी भेट घेऊन निर्णय रद्दची मागणी केली होती. जिल्ह्यातील राजकीय वातावरण पाणी प्रश्नावरून ढवळल्यानंतर उशिरा का होईना, जलसपंदा मंत्र्यांनी हा निर्णय मागे घेतला.
राज्याच्या जलसंपदा विभागाने 22 एप्रिल रोजी उजनीत येणारे पाच टीएमसी सांडपाणी इंदापूर तालुक्यातील 22 गावांना देण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यासंदर्भात बरेच गैरसमज झाल्याची कबुली जलसंपदा मंत्र्यांनी दिली. तो आदेश रद्द करून सुधारित आदेश काढले जातील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या आदेशाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT