भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल आणि डिझेल दरांवरुन मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे. काही वेळापूर्वीच एक ट्विट त्यांनी केलं आहे. त्यात सुब्रमण्यम स्वामी म्हणतात प्रभू रामचंद्रांच्या देशात पेट्रोल 93 रुपये लीटर आहे. सीतेच्या नेपाळमध्ये 53 रुपये लीटर आहे आणि रावणाच्या लंकेत 51 रुपये लीटर आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं हे ट्विट चर्चेचा विषय ठरतं आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी मोदी सरकारला घरचा अहेर दिला आहे.
ADVERTISEMENT
पाहा सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेलं ट्विट
सुब्रमण्यम स्वामी हे स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. त्यांनी काही वेळापूर्वीच हे ट्विट करुन मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या त्यांच्याच ट्विटची चांगलीच चर्चा आहे. हे ट्विट अनेक नेटकऱ्यांनी रिट्विट केलं आहे.
याआधी डिसेंबर महिन्यातही सुब्रमण्यम स्वामी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरुन मोदी सरकारवर टीका केली होती. खरंतर पेट्रोलचे भाव हे जास्तीत जास्त 40 रुपये लीटर असायला हवेत असंही त्यावेळी सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं होतं. कारण पेट्रोलची एक्स रिफायनरी किंमत ही 30 रुपये लीटर आहे. त्यावर 60 रुपयांचा टॅक्स जोडण्यात आला आहे. त्यामुळे हे दर वाढले आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी थेट प्रभू रामचंद्र, सीता आणि रावण यांच्या देशांचा दाखला आपल्य ट्विटमधून देत मोदी सरकारवर टीका केली आहे. पेट्रोलचा दर सध्या 93 रुपये प्रति लीटर असा आहे.
ADVERTISEMENT