उन्हाळ्याच्या सुट्टीत चुकूनही ‘या’ ठिकाणी जाऊ नका!

मुंबई तक

• 11:46 AM • 01 Jun 2022

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण बाहेर फिरायला जातात. पण ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपण योग्य ठिकाण निवडणं देखील गरजेचं आहे. उन्हाळ्यात काही ठिकाणी अजिबात फिरायला जाऊ नका. कारण इथे असणारा उष्मा हा तुम्हाला असह्य होऊ शकतो. गोवा: गोवामध्ये उन्हाळा हा तीव्र असतो. दिवसा इथे फिरणं हे फारच त्रासदायक ठरु शकतं. तसंच बीचवर तीव्र उन्हाच्या झळा जाणवत […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेक जण बाहेर फिरायला जातात. पण ही सुट्टी एन्जॉय करण्यासाठी आपण योग्य ठिकाण निवडणं देखील गरजेचं आहे.

उन्हाळ्यात काही ठिकाणी अजिबात फिरायला जाऊ नका. कारण इथे असणारा उष्मा हा तुम्हाला असह्य होऊ शकतो.

गोवा:

गोवामध्ये उन्हाळा हा तीव्र असतो. दिवसा इथे फिरणं हे फारच त्रासदायक ठरु शकतं. तसंच बीचवर तीव्र उन्हाच्या झळा जाणवत असतात.

आग्रा:

ताजमहल पाहण्यासाठी भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक येत असतात.

पण आग्रामध्ये कडक उन्हाळा असतो. जर तुम्हाला उन्हात फिरायला आवडत नसेल तर या सीझनमध्ये इथे येणं टाळाच.

जैसलमेर:

जैसलमेर हे राजस्थानमधील एक सुंदर ठिकाण आहे. पण उन्हाळ्यात इथे तापमान तब्बल 42 अंशापर्यंत पोहचतं.

जर तुम्हाला उन्हाळा अजिबात सहन होत नाही तर जैसलमरला जाण्याचा विचारच करु नका.

चेन्नई:

बीच लव्हर्ससाठी चेन्नई हे नेहमीच हॉट डेस्टिनेशन असतं. पण इथे उन्हाळ्यात फिरणं हे फारच कष्टप्रद ठरु शकतं.

चेन्नईमध्ये प्रचंड उष्मा असतो. त्यामुळे जर आपण चेन्नईच्या बाहेरच्या राज्यात राहणारे असाल आणि चेन्नईत उन्हाळ्यात जाण्याचा विचार करत असाल तर ते आपल्याला त्रासदायक ठरु शकतं.

अमृतसर:

अमृतसरमधील स्वर्ण मंदिर पाहण्यासाठी जगभरातून लोकं येत असतात.

मात्र, आता अमृतसरमध्ये कडाक्याचा उन्हाळा असतो. यामुळे इथे हिवाळ्यात जाणंच सुखकारक ठरु शकतं.

खजुराहो:

मध्यप्रदेशमधील खजुराहो प्राचीन आणि मध्यकालीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.

    follow whatsapp