‘डॉ. मशहूर गुलाटी’ भूमिकेतून प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणाऱ्या सुनील ग्रोव्हरची पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री होणार आहे. होय, अभिनेता सुनील ग्रोव्हर लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागम करतोय आणि तेही कॉमेडी शोमधून. त्यामुळे सुनील ग्रोव्हरच्या चाहत्यांसह सर्वच प्रेक्षकांना त्यांच्या नव्या शोची प्रतिक्षा लागलीये.
ADVERTISEMENT
सुनील ग्रोव्हर कोणत्या कॉमेडी शोमध्ये दिसणार आहे?
अभिनेता सुनील ग्रोव्हर कॉमेडी विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव असून, ज्याचा विशेष परिचय करून देण्याचीही गरज नाही. ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शो मधून सुनील ग्रोव्हर देशातील घराघरांत पोहोचला. त्यांचा स्वतंत्र चाहता वर्ग असून, त्याने डॉ. मशहूर गुलाटी या भूमिकेतून लोकांना पोट धरून हसायला लावलं.
कॉमेडीच्या माध्यमातून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्माचं २०१६ मध्ये बिनसलं. दोघांमध्ये वाद झाल्याचं अनेक रिपोर्टमधून सांगितलं गेलं. कपिल शर्मासोबत बिनसल्यानंतर सुनील ग्रोव्हरने कपिल शर्मा शो सोडला.
मध्ये बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर राहिल्यानंतर सुनील ग्रोव्हर पुन्हा एकदा प्रेक्षकांना पोट धरून हसवणार आहे. सुनील ग्रोव्हर लवकरच छोट्या पडद्यावर दिसणार असून, कपिल शर्मा शो नंतर आता सुनील ग्रोव्हर ‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s laughter champion) या शोमधून सुनील ग्रोव्हर नवी सुरूवात करणार आहे.
‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’मधून सुनील ग्रोव्हर हसवणार
‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s laughter champion) शोचा प्रोमो रिलीज झाला आहे. सुनील ग्रोव्हर शोमध्ये डॉ. मशहूर गुलाटीच्या भूमिकेत दिसत असून, लोकांचं मनोरंजनक करताना दिसत आहे.
सुनील ग्रोव्हरने डॉ. मशहूर गुलाटीच्या भूमिकेत एन्ट्री केल्यानंतर चाहत्यांनी जल्लोष केला. या शोचा प्रोमो रिलीज झाल्यानंतर आता त्यांच्या चाहत्यांसह सगळ्या प्रेक्षकांना त्यांची कॉमेडी बघण्याची उत्सुकता लागलीये.
‘इंडियाज लाफ्टर चॅम्पियन’ (India’s laughter champion) शोमध्ये जज अर्चना पूरन सिंह आणि शेखर सुमनही सुनील ग्रोव्हरच्या कॉमेडीवर लोटपोट हसताना दिसत आहेत.
सुनील ग्रोव्हर दिसणार शाहरुख खानसोबत?
सुनील ग्रोव्हरच्या इतर प्रोजेक्टबद्दल सांगायचं झालं, तर सुनील ग्रोव्हर आगामी काळात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. शाहरुख खानची भूमिका असलेल्या जवान मध्ये सुनील ग्रोव्हरची भूमिका आहे.
ADVERTISEMENT