मुंबई: बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनीचं लेटेस्ट ‘मधुबन’ या गाण्याने खळबळ उडवून दिली आहे. 22 डिसेंबरला रिलीज झालेल्या या गाण्याने आता एक मोठा वाद निर्माण झाला आहे. सनी लिओनीच्या या गाण्याला सोशल मीडियावर खूपच ट्रोल केले जात आहे. तिच्या या गाण्यावर अनेक यूजर्स प्रचंड नाराज असल्याचं दिसून आलं आहे. सनी लिओनीने या गाण्याद्वारे हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत असा आरोप ट्रोलर्सकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT
सनी लिओनीच्या गाण्यावरून वाद, बंदी घालण्याची मागणी
गाणे रिलीज झाल्यानंतर सनी लिओनीने ट्विटरवर चाहत्यांना विचारले की, त्यांनी हे गाणे पाहिले? सनी लिओनीने फक्त एवढंच विचारल्यानंतर ट्रोलर्सने तिला प्रचंड ट्रोल करणं सुरु केलं. अनेकांनी यावेळी सनी लिओनीच्या गाण्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली.
यावेळी एका यूजरने लिहिले – ‘अशा गाण्यांवर थिल्लरपणे डान्स करून तू पुन्हा आमच्या भावना दुखावल्या आहेत. सनी लिओनी तुला लाज वाटली पाहिजे.’
आणखी एका ट्रोलरने लिहिले – ‘राधिका डान्सर नव्हती ती एक भक्त होती. मधुबन हे शांततेचे ठिकाण आहे. मधुबनमध्ये राधा अशी नाचत नाही. लज्जास्पद गीत.’
एक व्यक्ती लिहिते – ‘एक नंबर वाह्यात परफॉर्मन्स. हे सर्व विकण्यापेक्षा भगवान श्रीकृष्ण आणि राधाची पूजा करायला शिका.’
एका संतप्त यूजरने लिहिले – ‘तुम्ही लोकांनी हिंदू धर्माची खिल्ली उडवली आहे.’
अनेक यूजर्सनी सनी लिओनीचे लेटेस्ट गाणे हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. यावेळी मधुबनच्या गाण्यांवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली आहे.
सनी लिओनीचे हे गाणे कनिका कपूरने गायले आहे. याआधीही दोघींच्या सुपरहिट जोडी ‘बेबी डॉल’ या गाण्यात दिसली होती. सनी लिओनीचं ‘बेबी डॉल’ हे गाणे खूपच हिट झालं होतं.
Sunny Leone चं मालदीवमध्ये व्हेकेशन.. पाहा खास फोटो
सनी लिओनीचं आता जे गाणं रिलीज झालं आहे त्याच्या डान्स या गणेश आचार्यने कोरिओग्राफ केल्या आहेत. तर गीतकार मनोज यादव याने ते गाणं लिहलं आहे. याच गाण्याच्या प्रमोशनसाठी सनी लिओनी ही मागील आठवड्यात कनिका कपूरसोबत बिग बॉसच्या घरात गेली होती.
ADVERTISEMENT