शिवसेनेत उभी फूट पडली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३८ ते ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेनं कारवाईचा बडगा उगारला आहे. ही राजकीय लढाई आता सर्वोच्च न्यायालयात जाऊन पोहोचली आहे.
ADVERTISEMENT
शिवसेनेनं गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केली आहे. तसेच १६ आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली आहे. उपाध्यक्षांनी आमदारांना भूमिका स्पष्ट करण्यास सांगितलं आहे. बंडखोर शिंदे गटाने गटनेते पदावरील नवी नियुक्ती, उपाध्यक्षांनी बजावलेली नोटीस आणि उपाध्यक्षांविरुद्ध आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावात सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल आहेत.
एकनाथ शिंदे आणि १६ आमदारांनी दोन याचिका दाखल केलेल्या असून, या याचिकांवर सध्या सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने ११ जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद झाला बघण्यासाठी खालील व्हिडीओवर क्लिक करा
ADVERTISEMENT