राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलंय. सुप्रिया सुळे यांची स्मरणशक्ती बहुदा कमी झालीये, असं वाटतं. आम्ही त्यांना स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक पाठवू, अशी असा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलाय.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे यांनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. सुप्रिया सुळे यांच्याकडून झालेल्या टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के म्हणाले, “सुप्रिया सुळे यांची स्मरणशक्ती बहुदा कमी झालेली आहे, असं मला वाटतंय. राज्यातली सत्ता गेलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली आहे. स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक नक्कीच पाठवू.”
अनिल देशमुख, नवाब मलिकांचं नाव घेत नरेश म्हस्के काय म्हणाले?
“सुप्रिया सुळे कदाचित विसरल्या असतील की, राज्याचे गृहमंत्री महिन्याला शंभर खोके, कोटी मागतो. त्यामुळे त्याला बेड्या ठोकल्या जातात. राज्याचा एक मंत्री ज्याने देश विघातक कामं केली. महाराष्ट्र आणि देशाविरोधात दंगली घडवल्या आहेत. पाकिस्तानची बाजू घेऊन भारताविरोधात कारवाई करतोय असा मोस्ट वॉण्टेड याच्याशी लागेबांधे आहेत म्हणून तो मंत्री आत जातो. त्याला बेड्या ठोकल्या जातात. तरी सुद्धा त्यांची खुर्ची मंत्रिमंडळात ठेवली जाते. तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का?”, असा उलट सवाल म्हस्के यांनी अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावरून सुप्रिया सुळेंना केलाय.
अशोक चव्हाण, अजित पवारांचं नाव घेत सुप्रिया सुळेंना नरेश म्हस्केंचा सवाल
“एक मुख्यमंत्री, आदर्श घोटाळ्यात त्यांना राजीनामा द्यावा लागतो. तेव्हा महाराष्ट्राची बदनामी झाली नाही का? सिंचन घोटाळा उघडकीस आला. त्यामध्ये कोण कोण होतं, हे सुद्धा सुप्रिया सुळे विसल्यात का? ज्यावेळी बॉम्बस्फोट झाले. मुंबईत अनेकजण मृत्युमुखी पडले. तेव्हा आपला एक मंत्री बडे बडे देशो मे ऐसी छोटी छोटी बाते होती है असं वक्तव्य करतो. तेव्हा बदनामी होत नाही का?”, असा प्रश्न म्हस्केंनी सुप्रिया सुळेंना केला आहे.
“सुप्रियाताई सत्ता गेलेली आहे. आपला भ्रमनिरास झालेला आहे. कदाचित आपली स्मरणशक्ती कमी झालेली असेल, तर एखादं स्मरणशक्ती वाढवण्याचं टॉनिक आपण घ्या. नक्कीच तुम्हाला कळेल. आपल्याला (राष्ट्रवादी काँग्रेस) लोकांनी जे प्रताप केलेले आहेत. उपदव्याप केलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे. महाराष्ट्राच्या शिरपेचात तुरा खोवला गेलेला नाहीये”, असं उत्तर नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंना दिलंय.
ADVERTISEMENT