बुधवारी इन्कम टॅक्स विभागाने अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या घरावर छापेमारी केली. फॅंटम फिल्मच्या टॅक्स चोरी संदर्भात ही कारवाई करण्यात आली. गेले तीन दिवस अनुराग आणि तापसी यांची इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान या सर्व प्रकरणासंदर्भात अभिनेत्री तापसी पन्नूने मौन सोडलंय.
ADVERTISEMENT
इन्कम टॅक्सच्या छापेमारीनंतर तापसनीने ट्विट करत या सर्व प्रकरणावर तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तापसीने 3 ट्विट्स केले असून पहिल्या ट्विटमध्ये ती म्हणते, 3 दिवस खूप शोधाशोध करून त्यांना 3 गोष्टी मिळाल्या. एक म्हणजे माझ्या पॅरिसमधील कथित घेतलेल्या बंगल्याच्या चाव्या. कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या जवळ आहेत.
दुसऱ्या ट्विटमध्ये तापसी म्हणते, दुसरी गोष्ट म्हणजे कथित 5 करोड रूपयांची रिसीट…तर तिसऱ्या ट्विटमध्ये तापसी म्हणते, आमच्या सन्माननीय अर्थमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार 2013 मधील छापेमारीच्या माझ्या आठवणी. शिवाय तापसीने पुढे, आता मी इतकी पण स्वस्त नाहीये असं म्हटलंय.
दरम्यान या प्रकरणात दोन वेगवेगळ्या केसेस आहे. इन्कम टॅक्स विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे, सर्च ऑपरेशनदरम्यान प्रोडक्शनमधील गैरव्यवहारासंदर्भात पुरावे मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामधून दोन वेगवेगळी प्रकरणं समोर आली आहेत. यामध्ये एक फँटम फिल्मच्या शेअरहोल्डर्स विरोधात आहे आणि दुसरं प्रकरण हे अभिनेत्री तापसी पन्नूच्या विरोधात आहे. तापसी पन्नू आणि तिच्या कंपनी विरोधात 25 करोड रूपयांच्या आयकर बुडवल्याचा आरोप आहे. तर फॅंटम फिल्म्सच्या शेअरहोल्डर्सवर सुमारे 600 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स चोरीचा संशय आहे.
ADVERTISEMENT