बुलडाणा: बुलडाणा (Buldana) जिल्ह्यातील नांदूरा येथील तहसील कार्यालयातील (Tehsil Office) तलाठ्याने (Talathi) गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे तहसील कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. अनिल अंभोरे असे या आत्महत्या करणाऱ्या तलाठ्याचं नाव असून आज (15 एप्रिल) सकाळी तहसील कार्यालयातील स्वच्छतागृहात दोरीच्या सहाय्याने या तलाठ्याने आत्महत्या केल्याचं आढळून आलं आहे.
ADVERTISEMENT
नांदूरा तहसील कार्यालयात आज गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास 45 वर्षीय तलाठी अंभोरे यांनी गळफास घेतल्याचं उघडकीस झाल्यानंतर येथील इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पुण्यात इंजिनिअर तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, नांदूरा तहसील अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत असलेले अनिल अंभोरे यांनी सकाळी तहसील कार्यालयातील येऊन आपल्या केबिनमधील स्वछतागृहात गळफास घेतला. सदर प्रकार उघडीस येताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तात्काळ पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला.
दरम्यान, तलाठी अंभोरे यांनी आत्महत्या का केली यामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सध्या नांदूरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी या संदर्भात सर्व बाजूने तपासाला सुरुवात केली आहे.
बारामतीत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या, विषारी औषध प्राशन केल्याने मृत्यू
तलाठी अनिल अंभोरे हे मूळचे घाडबोरी-मेहकर तालुका येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांना अद्याप तरी या प्रकरणी कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही. त्यामुळे अंभोरे यांच्यासारख्या शासकीय पदावर असणाऱ्या व्यक्तीने नेमकी आत्महत्या का केली असावी याबाबतचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. मात्र, या घटनेमुळे तहसील कार्यालयात मात्र एकच खळबळ उडाली आहे. (talathi in buldhana committed suicide by hanging himself at the tehsil office)
वनअधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येने महाराष्ट्रात उडाली होती खळबळ:
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिपाली चव्हाण या वन अधिकारी महिलेने आपल्या सर्विस रिव्हॉल्वरमधून गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी हे टोकाचं पाऊल उचललं होतं.
‘गर्भपात झाला तरी रजा दिली नाही’, वाचा दीपाली चव्हाणच्या पतीची संपूर्ण मुलाखत
दीपाली चव्हाण यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या सुसाइड नोटमध्ये असा आरोप केला होता की, ‘माझ्या आत्महत्येला वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार आणि वन्यजीव विभाग चिखलदरा हेच जबाबदार आहेत.’ या सुसाइड नोटमध्ये विनोद शिवकुमार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते.
‘विनोद शिवकुमारने मला अत्यंत त्रास दिला आहे. त्यांनी रजा कालावधीतील सुट्टी सुद्धा नाकारली होती. ऑक्टोबर 2020 मध्ये मी प्रेग्नंट असताना मला विनोद शिवकुमार यांनी ट्रॅकिंग करवलं गेलं. त्यामुळे माझा गर्भपात झाला. एवढंच नव्हे तर त्यावेळी देखील मला पुरेशी सुट्टी देण्यात आली नाही. तसंच विनोद शिवकुमार हे मला रात्रीबेरात्री कुठेही भेटण्यासाठी अश्लील भाषेत बोलायचे. यावेळी ते माझे मानसिक आणि आर्थिक नुकसान करत होते.’
‘अनेकदा सार्वजनिक ठिकाणी अनेक लोकांसमोर मला शिवीगाळ केली ज्यायची. अनेकदा शिवकुमारने मला त्यांच्या संकुलात बोलावले होते. ते माझ्या एकटेपणाचा गैरफायदा करत होते. पण मी त्यांच्या मर्जीनुसार न वागल्याने आता ते मला त्याच शिक्षा देत आहेत. मागील आठवड्यापासून शिवकुमार हे माझ्याशी खूप वाईट शब्दात बोलत आहेत. ज्याचा मला मानसिक त्रास होतोय.’ असे आरोप सुसाइड नोटमध्ये करण्यात आले होते.
Dipali Chavan: ‘तू पुन्हा लग्न कर पण नोकरीवाली बायको नको करू’, RFO दीपाली चव्हाणांचं शेवटचं पत्र
‘मुंबई तक’ने हे प्रकरण लावून धरल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर अटकेची आणि निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली होती.
ADVERTISEMENT