Viral Video: तालिबानने ‘त्या’ माणसाला हेलिकॉप्टरला लटकवून दिली शिक्षा? सत्य आलं समोर

मुंबई तक

• 10:49 AM • 01 Sep 2021

काबूल: 20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अमेरिकेने (America) अखेर अफगाणिस्तानमधून (Afghanistan) आपलं संपूर्ण सैन्य मागे घेतले आहे. 30 ऑगस्ट रोजी अमेरिकाचा शेवटचा सैनिकही अफगाणिस्तानमधून बाहेर पडला आहे. यानंतर, आता अफगाणिस्तानवर तालिबानचा (Taliban) एकछत्री अंमल सुरू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी काबूलमधील एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक माणसाला हेलिकॉप्टर (Helicopter) लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत होता. हाच व्हीडिओ […]

Mumbaitak
follow google news

काबूल: 20 वर्षांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर अमेरिकेने (America) अखेर अफगाणिस्तानमधून (Afghanistan) आपलं संपूर्ण सैन्य मागे घेतले आहे. 30 ऑगस्ट रोजी अमेरिकाचा शेवटचा सैनिकही अफगाणिस्तानमधून बाहेर पडला आहे. यानंतर, आता अफगाणिस्तानवर तालिबानचा (Taliban) एकछत्री अंमल सुरू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी काबूलमधील एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये एक माणसाला हेलिकॉप्टर (Helicopter) लटकलेल्या अवस्थेत पाहायला मिळत होता. हाच व्हीडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर असा दावा करण्यात आला होता की, ‘अमेरिकन सैन्याने माघार घेतल्यानंतर विमानतळावर एक हेलिकॉप्टर उडत होते, ज्यावर एक माणूस लटकत होता. अमेरिकन लष्कराला मदत केल्याबद्दल तालिबानने या माणसाला फाशीची शिक्षा दिली, तालिबानने त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे.’

दरम्यान, आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये हा दावा करणारा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अफगाणिस्तानमधील पत्रकारांनी मात्र, या व्हायरल व्हीडिओचे एक वेगळं सत्य मांडलं आहे.

त्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेली नव्हती, फक्त…

ज्या हेलिकॉप्टरवर एक माणूस लटकलेल्या अवस्थेत दिसत होता ते खरं तर एक अमेरिकन हेलिकॉप्टर हॉक होते. एकीकडे सोशल मीडियावर असा दावा केला जात होता की, हेलिकॉप्टरला लटकवून व्यक्तीला शिक्षा दिली जात आहे. पण स्थानिक पत्रकारांनी या व्हिडिओचे सत्य सांगितले आहे. हेलिकॉप्टरवर लटकलेल्या माणसाला फाशीची देऊन लटकविण्यात आलेलं नव्हतं तर फक्त 100 मीटर उंचीवर ध्वज लावण्याचे काम करण्यासाठी त्याला हेलिकॉप्टरमधून सोडण्यात आलं होतं.

म्हणजेच, त्याला कोणतीही शिक्षा दिली जात नव्हती. हेलिकॉप्टरला लटकलेली व्यक्ती ही तालिबानी आहे, जो झेंडा लावण्यासाठी मदत करत होता. जेणेकरून ध्वज इतक्या उंचीवर सहजपणे लावता येईल. मात्र, त्या व्यक्तीने केलेल्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही.

अमेरिकन पत्रकाराने शेअर केलेल्या व्हिडिओला रिप्लाय देत, अफगाणिस्तानचे पत्रकार बिलाल यांनी ट्वीट केले आहे की, ‘हेलिकॉप्टर उडवणाऱ्या व्यक्तीने फक्त अमेरिका आणि यूएईमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. व्हीडिओमध्ये एक तालिबान सेनानी आहे, जो झेंडा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे पण तो त्यात यशस्वी होऊ शकला नाही.’

वास्तविक, व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की त्या व्यक्तीला दोरीने हेलिकॉप्टरवर लटकवले गेले आहे. पण जर तुम्ही व्हिडीओ झूम केलात आणि बारकाईने पाहिले तर असे दिसून येते की, व्यक्तीला बांधण्यात आले आहे जेणेकरून तो ध्वज उंचावेल. असाच दावा अफगाण पत्रकारांनीही केला आहे.

तसेच, हा व्हिडिओ काबूल विमानतळाचा नसून कंधारच्या राज्यपाल कार्यालयाचा आहे. जिथे ध्वज उभारला जात होता.

हा व्हिडीओ अमेरिकेच्या अनेक नेत्यांनी, पत्रकारांनी हटवला आहे. कारण सत्य त्यांच्या दाव्यांपेक्षा वेगळे असल्याचे समोर आले आहे. तथापि, या व्हायरल व्हिडिओ व्यतिरिक्त, असे कोणतेही रिपोर्ट याबाबत अद्याप आलेले नाहीत.

Afghanistan Taliban: काबूलमधील महिलांचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हीही व्हाल सुन्न!

जेव्हा अमेरिका अफगाणिस्तान सोडली तेव्हा ती आपली अनेक शस्त्रे, वाहने आणि विमाने तिथेच सोडून परत आली. मात्र, अमेरिकेने असा दावा केला आहे की, आम्ही शस्त्र आणि वाहाने अशा पद्धतीने सोडली आहेत की, जी अजिबात वापरता येणार नाही. परंतु तालिबानचे म्हणणे आहे की, ते त्यांच्या इंजिनिअरर्सकडून या नादुरुस्त वस्तू बनवून पुन्हा वापरात आणणार आहेत.

    follow whatsapp