Tapsee Pannu ‘या’ व्यक्तीला देते दर महिन्याला 1 लाख रुपये, पण का…?

मुंबई तक

• 04:19 AM • 16 Mar 2023

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत तापसी पन्नूने आपण एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं आहे. अभिनया व्यतिरिक्त तापसी आणखी एका गोष्टीची काळजी घेताना दिसते ती म्हणजे फिटनेसची. तापसी फिटनेसबाबत खूप जागरुक दिसते. त्यामुळे ती दर महिन्याला तिच्या डाएटिशियनला 1 लाख रूपये देते. तापसी फक्त तिचा डाएट चार्ट बनवण्यासाठी डाएटिशियनवर एवढा खर्च करते. तापसी एका मुलाखतीत […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत तापसी पन्नूने आपण एक उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं आहे.

अभिनया व्यतिरिक्त तापसी आणखी एका गोष्टीची काळजी घेताना दिसते ती म्हणजे फिटनेसची.

तापसी फिटनेसबाबत खूप जागरुक दिसते. त्यामुळे ती दर महिन्याला तिच्या डाएटिशियनला 1 लाख रूपये देते.

तापसी फक्त तिचा डाएट चार्ट बनवण्यासाठी डाएटिशियनवर एवढा खर्च करते.

तापसी एका मुलाखतीत म्हणाली होती की, ‘ही गोष्ट जर माझ्या वडिलांना कळाली तर ते मला खूप ओरडतील.’

‘माझ्या वडिलांनी स्वत:वर कधीच खर्च केला नाही आणि आजही ते करत नाही. ते सेव्हिंग करण्यावर विश्वास ठेवतात.’

तापसी पुढे म्हणाली, ‘माझं डाएट सारखं बदलत असतं. माझ्या चित्रपटांप्रमाणे कसं डाएट घ्यायचं हे ठरतं.’

‘मी कोणत्या देशात, कोणत्या शहरात आहे याप्रमाणे डाएटिशियन कोणता डाएट घ्यायचा हे सुचवतं.’

तापसी तिच्या आईसाठीही डाएटिशियनकडून डाएट चार्ट बनवून घेते.

तापसी पन्नूचं म्हणणं आहे की, भविष्यात डॉक्टरवर पैसे खर्च करण्यापोक्षा डाएटिशियन आणि डाएटवर पैसे खर्च करा.

‘माझ्या आईचं मेटाबॉलिझन या डाएटने चांगलं राहतं त्यामुळे माझ्यासाठी हा काही फालतू खर्च नाही’ असं तापसीने सांगितलं.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp