वेदांता सेमीकंडक्टर निर्मिती प्रोजेक्ट पाठोपाठ महाराष्ट्रात प्रस्तावित असलेला टाटा एअरबस प्रोजेक्टसाठी गुजरातची निवड करण्यात आलीये. त्यावरूनच राज्यातल्या राजकीय वर्तुळात रणकंदन सुरू झालंय. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातल्या () नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपला लक्ष्य केलं जातंय. विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपनं आता थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी अशी मागणी केलीये.
ADVERTISEMENT
टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातमध्ये होणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनीही टीकास्त्र डागलंय.
विरोधकांकडून टीका होत असताना आता महाराष्ट्र भाजपच्या ट्विटर हॅण्डलवर एक सविस्तर पोस्ट करण्यात आलीये. त्यातून महाविकास आघाडी सरकारवर ठपका ठेवण्यात आला असून, उद्धव ठाकरेंना लक्ष्य करण्यात आलंय.
फाॅक्सकाॅनपाठोपाठ एअरबसचा महाराष्ट्राला ‘टाटा’ : 22 हजार कोटींचा प्रकल्प गुजरातला
टाटा एअरबस प्रोजेक्ट : भाजपनं उद्धव ठाकरेंसह विरोधकांना काय उत्तर दिलंय?
भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या या ट्विटमध्ये म्हटलंय की, ”एअरबस टाटा’ प्रकरणात उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. उद्धव ठाकरे अडीच वर्षे स्वतःला घरात कोंडून घेतल्यानेच ‘एअरबस टाटा’ गुजरातमध्ये गेली”, असा आरोप करत भाजपनं उद्धव ठाकरेंच्या सरकारलाच यासाठी जबाबदार धरलंय.
“भारताने 126 C-295 Medium Combat Aircraft साठी विविध निविदा मागवल्या होत्या. त्यात एअरबसची निवड करण्यात आली. मोदींनी 2015 साली एअरबसच्या फॅक्टरीला भेट दिली. त्यावेळी या विमानांचा स्पेनमधून पुरवठा करण्याचा प्रस्ताव एअरबसने ठेवला. 2017 मध्ये मेक इन इंडिया अंतर्गत यातील काही विमाने भारतात बनवायची मागणी भारत सरकारने केली”, असं या ट्विटमध्ये म्हटलंय.
Tata Airbus : ४ प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, उदय सामंत राजीनामा देणार का? – आदित्य ठाकरे
tata airbus project : ‘महाराष्ट्राने प्रस्तावच दिलेला नव्हता’
पुढे भाजपनं म्हटलंय की, “त्यानंतर टाटा समूहासोबत सामूहिक भागीदारी करून एअरबसने 2020 मध्ये भारतात प्रकल्प टाकायला पाहणी सुरु केली. यावेळी महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव दिल्याची नोंद नाही.”
“सप्टेंबर 2021 मध्ये बंगळूरू, हैद्राबाद, गुजरात आणि उत्तर प्रदेश येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकायचा प्राथमिक निर्णय घेतला. या काळात महाराष्ट्र सरकारने कोणताही प्रस्ताव व या प्रकल्पाबाबत चर्चा झाल्याची नोंद सरकार दरबारी कुठेही आढळून आलेली नाही”, असा दावा महाराष्ट्र भाजपनं विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना केलाय.
“फेब्रुवारी 2022 ला पुन्हा एकदा प्रकल्पाचा पुन्हा विश्लेषण करण्यात आले. यावेळी सुद्धा महाराष्ट्र सरकारकडून कोणीही एअरबसच्या अधिकाऱ्यांना भेटल्याची नोंद नाही. सप्टेंबर 2022 मध्ये एअरबसच्या प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करताना बोलल्याची नोंद आहे.
एअरबसशी चर्चा न करता प्रकल्प महाराष्ट्रात कसा येऊ शकतो? यावर महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे”, असा टोलाही भाजपनं लगावला आहे.
Uday Samant यांचा दावा “टाटा एअरबसचा प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला गेला”
टाटा एअरबस प्रोजेक्टवरून जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवेंना सवाल
“तब्बल अडीच वर्षात एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आला नाही? याचा अभ्यास जयंत पाटील, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी केला आहे का? कोणताही उद्योग राज्यात स्वतः हून येत नाही. उद्योगधंद्याना वातावरण पोषक हवं. खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटकं ठेवून, राज्यातील उद्योगधंदे बंद उद्धव ठाकरेंनी करायला लावले. त्याला साथ राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली”, अशी टीका भाजपकडून करण्यात आलीये.
” 4 महिन्यात कोणत्याही प्रकल्पाची पायाभरणी होत नाही. यासाठी वर्षे दोन वर्षे प्लॅनिंग, बिडिंग असतो. हे मविआच्या ‘त्या’ दोन-तीन पत्रकारांना कळू नये?”, असं भाजपनं ट्विटमध्ये म्हटलंय.
ADVERTISEMENT