गेल्या वर्षी जून महिन्यात अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली होती. दरम्यान अजूनही सुशांतच्या मृत्यूच्या मागचं कारण स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणावर सिनेमा तयार करण्यात आला आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर देखील लाँच करण्यात आला. ‘न्याय- द जस्टिस’ असं या सिनेमाचं नाव आहे.
ADVERTISEMENT
दिलीप गुलाटी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे, ‘न्याय- द जस्टिस’ या सिनेमात अभिनेता सुशांतची भूमिका सुशांतची भूमिका जुबेर करत आहे. तर रिया चक्रवर्तीची भूमिका श्रेया साकारत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जून रोजी हा सिनेमा रिलीज करण्यात येणार आहे.
विकास प्रॉडक्शनतर्फे ‘न्याय- द जस्टिस’ या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. या सिनेमाची कथा सुशांतचा मृत्यू कसा झाला या प्रश्नाभोवतीच पहायला मिळतेय. आहे. या सिनेमाचा टिझर 58 सेकंदाचा आहे. सुप्रसिद्ध अभिनेता महिंदर सिंग याच्या मृत्यूच्या ब्रेकिंग न्यूजने टिझरची सुरुवात होतेय. यानंतर अभिनेत्याचं संपूर्ण मृत्यूप्रकरण उलगडण्याचा प्रयत्न केलाय. ज्याप्रमाणे सुशांतच्या मृत्यूचा तपास देशाभरातील तीन सयंत्रणा करत होत्या त्याचप्रमाणे या टिझरमध्ये दाखवण्यात आलं आहे.
या सिनेमामध्ये असरानी, अमन वर्मा, शक्ती कपूर, अनंत जोग, अनवर फतेहण तसंच सुधा चंद्रन हे कलाकार प्रमुख भूमिका साकारणात आहेत.
ADVERTISEMENT