ADVERTISEMENT
संपूर्ण महाराष्ट्राला सध्या हुडहुडी भरली आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पारा खाली घसरल्यामुळे राज्यात थंडीची लाट पसरलेली पहायला मिळत आहे.
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरलाही थंडीने गारठवून टाकलं आहे. पर्वत रांगामध्ये थंडीमुळे निर्माण झालेलं चित्र कोणाचंही मन मोहून टाकणारं आहे.
रात्रीच्या वेळी महाबळेश्वरचा पारा ८ अंशांच्या घरात खाली घसरला होता.
अशा कडाक्याच्या थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी महाबळेश्वर आणि नजिकच्या परिसरात गावकरी शेकोटी पेटवून उब घेताना दिसत आहेत.
महाबळेश्वर हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण मानलं जातं. प्रत्येक वर्षी या मोसमात अनेक पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात.
आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णालेक आणि लिंगमळा परिसरातला तापमानाचा पारा शुन्य अंशाच्या जवळ गेलेला पहायला मिळाला यामुळे महाबळेश्वरात दवबिंदु गोठतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
धुक्यात हरवलेली वाट, रस्त्याच्या कडेला थांबलेली गाडी…कोणत्याही चित्रकाराला हे दृष्य प्रेरणा देणारं ठरेल
दवबिंदू गोठून पाचगणी भागात गाड्यांच्या टपावर बर्फ जमा झालेला पहायला मिळाला.
सकाळच्या वेळेत कोवळी उनं पडल्यानंतरही महाबळेश्वर पट्ट्यात थंडी आणि गार वाऱ्यांचा प्रभाव कायम पहायला मिळतो आहे.
सध्या कोरोनामुळे महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेक आणि नजिकच्या परिसरात पर्यटन बंद असल्यामुळे इथे शुकशुकाट पहायला मिळतो आहे.
संपूर्ण महाबळेश्वर भागात सध्या असंच चित्र पहायला मिळतं आहे.
काय मग, फोटो पाहून भरली की नाही हुडहुडी?
ADVERTISEMENT