पुणे : येथील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलावर भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. सातारहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरचे ब्रेक फेल झाल्याने समोर येणाऱ्या गाड्यांना या कंटेनरची धडक बसली अशी, प्राथमिक माहिती आहे. यात तब्बल ३० हुन अधिक वाहनांचं नुकसान झालं आहे. अपघातादरम्यान रस्त्यावर ऑइल सांडल्याने रस्ता अधिकच निसरडा झाला, त्यामुळे गाड्यांची संख्या अधिकाधिक वाढत गेली.
ADVERTISEMENT
दरम्यान, अग्निशमन दलाच्या २ रेस्क्यु व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूंकडील महामार्गावरील वाहतुकीवरही मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे तीन किलोमीटरच्या रांगा लागले आहेत. अपघातस्थळी सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित आहेत.
ADVERTISEMENT