Russia: पर्म विद्यापीठात अंदाधुद गोळीबार, 8 विद्यार्थी ठार; 14 जखमी

मुंबई तक

• 01:17 PM • 20 Sep 2021

पर्म (रशिया): रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात (Perm State University) एका तरुणाने केलेल्या गोळीबारात (Russian University Shooting) तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रशियात एकच खळबळ माजली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी अनेक विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन धावत होते. स्थानिक मीडियाच्या […]

Mumbaitak
follow google news

पर्म (रशिया): रशियातील पर्म स्टेट विद्यापीठात (Perm State University) एका तरुणाने केलेल्या गोळीबारात (Russian University Shooting) तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने रशियात एकच खळबळ माजली आहे. अचानक झालेल्या या गोळीबाराने संपूर्ण विद्यापीठ परिसरात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी अनेक विद्यार्थी हे जीव मुठीत घेऊन धावत होते. स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, सुरक्षारक्षकांनी नंतर हल्लेखोराला देखील ठार केलं.

हे वाचलं का?

दरम्यान, हल्ला झाल्याचं लक्षात येताच काही वर्गामधील अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी थेट खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे व्हीडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून 14 जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती बंदूक घेऊन सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये घुसला. विद्यापीठातील एका इमारतीत घुसल्यानंतर या व्यक्तीने अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली.

रशियातील टीएएसएस न्यूज एजन्सीने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी स्वत:ला विद्यापीठातील ऑडिटोरियममध्ये बंद करवून घेतलं होतं. जेणेकरुन त्यांचा हल्लेखोरापासून बचाव होईल. तर काही जणांनी थेट खिडक्यांमधून खाली उड्या मारल्या.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच सुरक्षा दलाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले. काही वेळ चाललेल्या चकमकीनंतर हल्लेखोराला ठार करण्यात आलं. हा हल्लेखोर याच विद्यापीठातील विद्यार्थी असल्याची माहिती नंतर समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हल्लेखोर अवघ्या 18 वर्षांचा होता.

हल्ल्याची माहिती मिळताच विद्यापीठ परिसरातील लोकांनी इतरांना तात्काळ सावध केलं आणि कॅम्पस सोडून सुरक्षित ठिकाण गाठण्यास सांगितलं. ज्यामुळे अनेकांचे जीव वाचले. दरम्यान, या हल्ल्यानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर येथील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. ज्यात काळे कपडे परिधान केलेला आणि बंदूक हातात घेऊन कॅम्पसमध्ये फिरत असलेला एक व्यक्ती दिसत आहे.

काबूल: पाकिस्तानविरोधी रॅली काढणाऱ्या महिलांवर तालिबान्यांचा गोळीबार

या हल्ल्यानंतर संपूर्ण विद्यापीठात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका का करण्यात आला याबाबतचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत हल्लोखोराला कंठस्नान घालण्यात आलं आहे.

    follow whatsapp