शिंदे गटाला झुकतं माप मिळतंय, खरमरीत पत्र लिहित ठाकरे गटाचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

मुस्तफा शेख

• 08:08 AM • 13 Oct 2022

Thackeray vs Shinde दुभंगलेल्या शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार चिन्ह दिलं. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आणि मशाल हे पक्षचिन्ह मिळालं. मशाल हे चिन्ह घेऊन आता उद्धव ठाकरे पुढे […]

Mumbaitak
follow google news

Thackeray vs Shinde दुभंगलेल्या शिवसेनेचा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला होता. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार चिन्ह दिलं. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव मिळालं आणि मशाल हे पक्षचिन्ह मिळालं. मशाल हे चिन्ह घेऊन आता उद्धव ठाकरे पुढे जात आहेत. तर शिंदे गटाने त्यांची वाट निवडली आहे. अशात निवडणूक आयोगाला ठाकरे गटाने एक खरमरीत पत्र लिहिलं आहे. शिंदे गटाला झुकतं माप दिलं जात असल्याचा गंभीर आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

चार पानी पत्रात काय आहेत महत्त्वाचे मुद्दे ?

निवडणूक आयोगा आम्हाला सापत्न वागणूक देत आहे

चिन्ह आणि नाव देताना शिंदे गटाला झुकतं माप देण्यात आलं

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याबाबत निवडणूक आयोग भेदभाव का करतो आहे?

निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला प्राधान्य दिलं जातं आहे

निवडणूक आयोगानच्या सूचनेनंतरही शिंदे गटाने कागदपत्रं सादर केलेली नाहीत

शिंदे गट अंधेरी पोटनिवडणूक लढवत नसतानाही आमचं चिन्ह रद्द करण्यात आलं

आम्ही (ठाकरे गट) सादर केलेल्या कागदपत्रांची माहिती शिंदे गटाला कशी काय मिळते?

आमच्या पक्षाचं नाव आणि चिन्हाचे पर्याय आधीच उघड कसे झाले?

ठाकरे गटाने आणखी काय म्हटलं आहे?

असे काही आरोप करत शिंदे गटाने चार पानांचं खरमरीत पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. याच निवडणूक आयोगानं चिन्हासंदर्भात जे निर्णय घेतले, त्या सर्व निर्णयांमध्ये उघडउघडपणे पक्षपातीपणा केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. आम्ही दिलेले चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगानं जाणून-बुजून दुसऱ्या बाजूला कळतील, अशा पद्धतीनं वेबसाईटवर टाकले, असा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यांच्या याच भूमिकेमुळं शिंदे गटाला आमची सगळी रणनिती कळाली, असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे.

निवडणूक आयोगानेच आमची रणनीती शिंदे गटाकडे उघड केली

निवडणूक आयोगानंच आमची सगळी रणनीती शिंदे गटाकडे उघड केली. आमच्याच यादीतील चिन्ह आणि नावाचे पर्याय शिंदे गटानं कसे सादर केले? हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीमुळंच शक्य झालं, असा आरोपही ठाकरे गटानं या पत्रातून केला आहे.

    follow whatsapp