ITI ची जागा उर्दू भाषा केंद्राला? ठाकरे सरकारच्या काळातील BMC चा निर्णय वादात

मुंबई तक

31 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:30 AM)

मुंबई : महापालिकेने मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा (ITI) प्रकल्प बंद करून सदरील जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरु केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रीय बाल आयोगाने लक्ष घातलं असून, महापालिकेला दहा दिवसांमध्ये कारवाई करुन अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांनी याबाबतची तक्रार केली होती. ठाकरे सरकारमध्ये नवाब मलिक कौशल्य विकासमंत्री […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : महापालिकेने मुलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्राचा (ITI) प्रकल्प बंद करून सदरील जागेवर उर्दू भाषा केंद्राचे बांधकाम सुरु केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रीय बाल आयोगाने लक्ष घातलं असून, महापालिकेला दहा दिवसांमध्ये कारवाई करुन अहवाल सादर करण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. योगेश देशपांडे यांनी याबाबतची तक्रार केली होती.

हे वाचलं का?

ठाकरे सरकारमध्ये नवाब मलिक कौशल्य विकासमंत्री होते. त्यावेळी भायखळ्यातील आग्रीपाडा इथे ‘आयटीआय’ प्रशिक्षण केंद्राच्या जागेवर ‘उर्दू भाषा केंद्र’ बांधण्याचा घाट घालण्यात आला होता, असा आरोप करण्यात येत आहे. तसंच यासाठी मलिक यांच्या खात्याने तात्काळ पावलं उचलत १२ कोटींचा निधी दिला होता, असाही दावा करण्यात येत आहे.

सदरील आयटीआय प्रशिक्षण केंद्रासाठी आग्रीपाडा येथे भूखंड राखीव ठेवण्यात आला होता. त्याच भूखंडावर आता उर्दू भवनचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या तक्रारीची दखल घेत मुलांच्या/विद्यार्थी हितासाठी कारवाई करण्याकरिता राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने बृन्हमुंबई महानगरपालिकेस नोटीस बजावली आहे.

नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीचं केलं होतं आंदोलन :

दरम्यान, या विरोधात आंदोलन करुन भाजप आमदार नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वीच आवाज उठवला होता. हक्काच्या आयटीआयच्या जागेवर घाईने ऊर्दु प्रशिक्षण केंद्र बांधण्याची गरज काय आहे? तुम्हाला दुसरीकडे जागा मिळत नाही का? असा सवाल नितेश राणे यांनी केला होता.

आम्ही कोणत्याही जात, धर्म आणि भाषेच्या विरोधात नाही. कुणाला काय करायचं ते करा. पण आमच्या हक्काच्या जागेवर काहीही बांधलं जात असेल, आमच्या मुलांचं भविष्य अंधारात टाकलं जात असेल तर आम्ही सहन करणार नाही. महाराष्ट्रात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे हिंदुंवरील अन्याय सहन करणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला होता.

    follow whatsapp