परमबीर सिंग यांच्या विरोधात ठाणे कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. खंडणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकण्याच्या गुन्ह्यात ठाणे न्यायालयाची सूनवाई, केतन तन्ना आणि सोनू जलान यांनी दाखल केला आहे परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंग हे फरार आहेत.
ADVERTISEMENT
याआधी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना चौकशीसाठी हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती. गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंग, सचिन वाझे आणि अन्य लोकांच्या विरोधात खंडणीचं प्रकरण दाखर करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला. अशात परमबीर सिंग यांच्या मुंबई येथील घराच्या बाहेर नोटीस चिकटवण्यात आली. . एक टीम हरयाणा या ठिकाणीही नोटीस देण्यासाठी गेली होती. या नोटीसच्या माध्यमातून परमबीर सिंग यांना 12 ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र परमबीर सिंग हजर झालेले नाहीत. आता ठाणे कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं आहे.
परमबीर सिंग देश सोडून पळून गेलेत; जयंत पाटील यांची धक्कादायक माहिती
परमबीर सिंग यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात बिल्डर आणि हॉटेलियर बिमल अग्रवाल यांनी तक्रार दाखल केली. अग्रवाल यांनी हा आरोप केला आहे परमबीर सिंग यांनी त्याच्याकडे नऊ लाख रूपयांची खंडणी मागितली. त्या बदल्यात तुझ्या बार आणि रेस्तराँवर छापा मारला जाणार नाही असंही सांगितलं होतं. बिमल अग्रवाल त्याचे बार आणि रेस्तराँ हे पार्टनरशिपमध्ये चालवतो. एवढंच नाही तर परमबीर सिंग यांनी त्याला दोन स्मार्ट फोन खरेदी करायला सांगितले होते ज्याची किंमत साधारण तीन लाखांच्या घरात आहे.
परमबीर सिंग, निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे, सुमीत सिंग, अल्पेश पटेल, विनय सिंग, छोटा शकील यांचीही नावं FIR मध्ये आहेत. परमबीर सिंग यांना जेव्हा मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आलं तेव्हा त्यांनी त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. दर महिन्याला अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला १०० कोटी रूपये गोळा करून आणण्याचं टार्गेट दिलं होतं. मात्र हे सगळे आरोप देशमुख यांनी फेटाळले. पुढे हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर आणि कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुखांना गृहमंत्रीपद सोडावं लागलं. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंगही समोर आलेले नाहीत. ते देशाबाहेर गेले असावेत असा संशय तपास यंत्रणांना आहे. काही दिवसांपूर्वीच ते फरार झाल्याचीही माहिती राज्य सरकारने कोर्टाला दिली होती.
ADVERTISEMENT