ठाणे: कोरोना रुग्णाचा मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीतून पाठवला स्मशानात

मुंबई तक

• 03:19 AM • 13 Apr 2021

ठाणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे महानगरपालिकेचे सर्व दावे सपशेल फोल ठरल्याचे सध्या दिसून आलं आहे. एवढंच नव्हे तर एक असं प्रकरण समोर आलं आहे की, ज्याने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे शव वाहून नेण्यासाठी चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याचे आढळून आलं आहे. ही गोष्ट उघडकीस येतातच संपूर्ण ठाण्यात एकच […]

Mumbaitak
follow google news

ठाणे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणे महानगरपालिकेचे सर्व दावे सपशेल फोल ठरल्याचे सध्या दिसून आलं आहे. एवढंच नव्हे तर एक असं प्रकरण समोर आलं आहे की, ज्याने संपूर्ण ठाण्यात खळबळ उडाली आहे. कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचे शव वाहून नेण्यासाठी चक्क कचऱ्याच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यात येत असल्याचे आढळून आलं आहे.

हे वाचलं का?

ही गोष्ट उघडकीस येतातच संपूर्ण ठाण्यात एकच संतापाची लाट उसळली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सध्या सर्वत्र थैमान घातले असून दररोज अनेकजण मृत्यूमुखी पडत आहेत. सध्या कोविड सेंटर्समध्ये देखील ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या सगळ्यात आता मृतदेहाची होणारी हेळसांड यामुळे ठाणेकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

Corona रूग्णांसाठी मुंबई महापालिका हॉटेल्स ताब्यात घेण्याच्या तयारीत

कोरोना रुग्णांचे मृतदेह झाकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या संपल्याने चक्क कचऱ्याच्या काळ्या पिशव्या वापरण्यात येत असल्याचा निंदनीय प्रकार आज जवाहरबाग स्मशानभूमीत पाहायला मिळाला. कोविड सेंटर्स बाहेर शववाहिन्या तासनतास उभ्या राहत असून पिशव्यांअभावी मृतदेह सोपाविण्यास विलंब होत असल्याने स्मशानभूमीत प्रचंड गर्दी होत असल्याचं देखील समोर आलं आहे.

कोट्यवधी रुपयांचं वार्षिक बजेट असलेल्या ठाणे महापालिकेमध्ये जर असं कृत्य घडत असेल तर ती लाजिरवाणी बाब असून महापौर आणि पालकमंत्र्यांनी त्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश मोरे यांनी केली आहे.

पुढच्या पंधरा दिवसात आरोग्यसेवांवर सर्वाधिक ताण पडण्याची चिन्हं- अजित पवार

याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील मुंबई तकने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अद्याप अधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकलेला नाही.

सध्या ठाणे जिल्ह्यात एकूण 75 हजार 683 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. याशिवाय आतापर्यंत 6277 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबई पाठोपाठ ठाण्यात देखील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढत आहे. याशिवाय मृतांचा आकडा देखील वाढत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 51 हजार 751 कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 258 मृत्यूंची नोंद दिवसभरात झाली आहे. सध्या राज्यात 32 लाख 75 हजार 224 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 29 हजार 399 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. आज घडीला राज्यात 5 लाख 64 हजार 746 अॅक्टिव्ह केसेस आहेत.

‘लॉकडाऊनची संपूर्ण तयारी झाली आहे,पण…’, आरोग्यमंत्र्यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

राज्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 34 लाख 58 हजार 996 इतकी झाली आहे. आज महाराष्ट्रात 258 कोरोना रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यापैकी 169 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 59 मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. तर 30 मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा जास्त कालावधीतले आहेत.

    follow whatsapp